AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच वॉर्डात शिवसेनेचे दोन उमेदवार, माघार कोण घेणार? एकनाथ शिंदेंसमोर मोठा पेच…

Shivsena : शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 204 मधून शिवसेनेकडून अरुण दळवी आणि माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोघांनाही एकात वॉर्डातून उमेदवारी देण्यात आली आहे. आता माघार कोण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकाच वॉर्डात शिवसेनेचे दोन उमेदवार, माघार कोण घेणार? एकनाथ शिंदेंसमोर मोठा पेच...
Shivsena 2 CandidateImage Credit source: TV 9 Marathi
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: Dec 30, 2025 | 9:53 PM
Share

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज मुंबईतील सर्व उमेदवारानी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची महायुती आहे. शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 204 मधून शिवसेनेकडून अरुण दळवी आणि माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोघांनीही शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकाच जागेसाठी शिवसेनेने दोन उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीतून माघार कोण घेणार हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एकाच वॉर्डात शिवसेनेचे दोन उमेदवार

शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 204 मधून शिवसेनेकडून अरुण दळवी आणि माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही उमेदवारांनी शिवसेनेच्या AB फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अरुण दळवी यांनी भाजपमधून काल शिंदे सेनेत प्रवेश करून सेनेकडून उमेदवारी मिळवली आहे, तर माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून AB फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरला आहे.

2 जानेवारीला माघार कोण घेणार?

प्रभाग क्रमांक 204 च्या उमेदवारीची चर्चा आता रंगली आहे. 2 जानेवारीला अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. त्यामुळे अरुण दळवी की अनिल कोकीळ माघार कोण घेणार? याकडे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 204 मधून गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि ठाकरेंचे शाखाप्रमुख किरण तावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अनिल कोकीळ यांच्या प्रवेशावर ज्येष्ठ शिवसैनिक संतापले

माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ज्येष्ठ शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला होता. अनिल कोकीळ यांनी दिलेली बॅग आणि साहित्य ज्येष्ठ शिवसैनिकाने जाळलं आहे. गद्दाराला हाकलवून द्या, त्याला कुठेही उभा करू नका असं म्हणत लालबाग येथील ज्येष्ठ शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?