केंद्रीय तपास यंत्रणांचा महाराष्ट्रात अतिरेक, सुप्रिया सुळेंचं पुढचं पाऊल; गृहमंत्री अर्थमंत्र्यांकडे तक्रार

| Updated on: Mar 27, 2022 | 7:33 PM

बारामतीत शरद पवार (Sharad Pawar) साहेब आणि अजितदादांच्या (Ajit Pawar) माध्यमातून झालेली विकासकामे आणि कृषि विज्ञान केंद्रासह अन्य संस्था याबद्दल सातत्याने चर्चा होत असते. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी याबाबत सर्वपक्षीय खासदारांचा दौरा पार पडला.

केंद्रीय तपास यंत्रणांचा महाराष्ट्रात अतिरेक, सुप्रिया सुळेंचं पुढचं पाऊल; गृहमंत्री अर्थमंत्र्यांकडे तक्रार
सुप्रिया सुळेंचं पुढचं पाऊल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बारामती – बारामतीत शरद पवार (Sharad Pawar) साहेब आणि अजितदादांच्या (Ajit Pawar) माध्यमातून झालेली विकासकामे आणि कृषि विज्ञान केंद्रासह अन्य संस्था याबद्दल सातत्याने चर्चा होत असते. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी याबाबत सर्वपक्षीय खासदारांचा दौरा पार पडला. बारामती एमआयडीसी, विविध संस्था, टेक्सटाईल पार्क अशा विविध संस्थांना भेटी देवून त्यांनी माहिती घेतली. त्याबाबत काही सुचना दिल्या, एकत्रितपणे काही सुधारणा करता येतील का याबाबत या दौऱ्यात चर्चा केली गेली अशी माहिती सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली.

अमित शहा आणि निर्मला सितारामण यांच्याकडे तक्रार

राज्यातील केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकाबाबत मी अमित शहा आणि निर्मला सितारामण यांच्याकडे तक्रार केलीय. त्यांनी मला संसदेत उत्तरही दिलेलं आहे. कोणीही कायम सत्तेत नसतं आणि असाही कोणी निर्णय घेवू नये की त्याचा गैरवापर होईल अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली. आपल्या विरोधकांना त्रास देण्याच्या हेतूने त्याचा वापर होवू नये असा प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे. या देशातलं राजकारण बदलल्याचं अजितदादा म्हणतात. तशीच आज परिस्थिती आहे. सूडाचं राजकारण हे या देशात कधीच नव्हतं. पण सध्या हे सातत्यानं पहायला मिळतंय. देशासमोर महत्वाचे प्रश्न आहेत. आज महागाई, रोजगार असे गंभीर विषय आहेत. कोरोनातून आपण आता बाहेर पडतोय. तेव्हा राजकारण्यांनी देश कसा पुढे जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. राजकारण होतच राहील. निवडणुका आल्यानंतर लढूचं, पण आता या देशाला कशाची गरज आहे तर अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची. तसेच लोकांच्या हाताला काम देण्याची आणि कोरोनामुळे व जगातील परिस्थितीमुळे देशात निर्माण झालेल्या संकटावर मात करण्याची त्यावर लक्ष देणं आवश्यक आहे असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

देशातली महागाई लपवण्यासाठी विरोधी पक्षाचे आरोप

सातत्याने केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्ष आरोप-प्रत्यारोप करत आहेत. हे महागाई लपण्यासाठी केलं जातंय असं मला वाटतं. महागाई आणि परदेशातून परतलेल्या विद्यार्थ्यांचं पुढं काय होणार असे अनेक प्रश्न समोर असताना थातूरमातूर आरोप आणि पेनड्राईव्ह हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत न शोभणारं आहे. देश कसा पुढे जाईल आणि जनतेला महागाईतून कसा दिलासा मिळेल हे बघणं महत्वाचं आहे अशी टीका सुप्रिया सुळेंनी भाजप सरकारवरती केली.

Pakistan : इम्रान खान राजीनामा देण्याची शक्यता, अचानक 50 मंत्री गायब, पाकिस्तानात राजकीय भूकंप?

DC vs MI Live Score, IPL 2022 : मुंबईने जिंकायचा सामना हरला, ललित यादव-अक्षर पटेलने विजय अक्षरक्ष: खेचून आणला

नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स