सुषमा अंधारेंच्या हाती शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; ठाकरेंचा पुन्हा एकदा शिंदेंवर निशाणा

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सुषमा अंधारे यांच्या हाती शिवबंधन बांधलं. त्यावेळी आदित्य ठाकरे, अरविंद सावतं, सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर जोरादर निशाणा साधलाय.

सुषमा अंधारेंच्या हाती शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; ठाकरेंचा पुन्हा एकदा शिंदेंवर निशाणा
सुषमा अंधारे यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेशImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 3:29 PM

मुंबई : एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला घरघर लागली आहे. या स्थितीतून सावरण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांनी बैठका आणि मेळाव्यांचा सपाटा लावलाय. तसंच पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही हाती घेण्यात आलाय. त्याच पार्श्वभूमीवर आज आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच प्रवेश केला. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सुषमा अंधारे यांच्या हाती शिवबंधन बांधलं. त्यावेळी आदित्य ठाकरे, अरविंद सावतं, सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर जोरादर निशाणा साधलाय.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आता काही लोक नसलेल्या शिवसेनेची पद वाटत आहेत. त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. मी आपल्या खऱ्याखुऱ्या शिवसेनेचं पद वाटत आहे. अनेकांना मी पद आणी जबाबदाऱ्या देत असतो. आता दोन लढाया सुरु आहेत. एक म्हणजे कायद्याची आणि दुसरी जनतेची. ही लढाई, हा निकाल काही फक्त शिवसेनेच्या भवितव्याचा निकाल नाही. तर देशात लोकशाही जिवंत आहे का ते कळेल. जे लोक इकडे वाढले, मोठे झाले, ते आता तिकडे गेले. शिवसेना आणि बाळासाहेबांनी सामान्यातून असामान्य लोक तयार केली. ते आता तिकडे केले. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य नेतृत्व तयार करण्याची वेळी आलीय, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

सुषमा अंधारेंकडे शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी

मी आज सुषमाताईंना एक जबाबदारी देत आहे. मी त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद देत आहे. शिवसेनेसाठी तुम्ही चांगलं काम कराल अशी खात्री आहे. सुषमाताईंसोबत लढणारे सैनिक माझ्यासोबत आले आहेत. नेमक्या लढाईच्यावेळी त्या आमच्यासोबत आल्या आहेत, असंही ठाकरे म्हणाले. नीलम गोऱ्हे यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नीलमताई काही कडवट हिंदुत्ववादी नव्हत्या. आता त्यांना शिवसेनेत 24 वर्षे झाली आहेत. एकदा त्यांचा मला फोन आला तेव्हा मला त्या खडून वाटल्या. त्यानंतर त्या मला भेटण्यासाठी आल्या तेव्हा त्या मला 3 तास बोलत बसल्या आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचं हिंदुत्व अनेकांना माहिती नाही. फक्त पूजा अर्जा करणे म्हणजे हिंदुत्व नाही. बाळासाहेबांचं हिंदुत्व वेगळं आहे, असंही ठाकरे यांनी आवर्जुन सांगितलं.

भाजपविरोधात लढण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत

शिवेसना प्रवेशावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनीही भाजपला इशारा दिलाय. अंधारे म्हणाल्या की, माझं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही असं जेव्हा उद्धव टाकरे म्हणाले तेव्हाच तळागाळात विचार गेला. त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश करण्याचं ठरवलं. माझ्या डोक्यावर ईडीचं ओझं नाही. मी कुठल्या लोभापाई आले नाही. नीलमताई माझ्या पाठीशी आहेत. माझ्याकडून चुकीचं काही होणार नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. त्यामुळे भाजपविरोधात लढण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत आलो असल्याचं अंधारे यांनी सांगितलं. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यांचा पाशवी वापर करुन संविधानिक चौकट मोडली जात आहे, असा आरोपही अंधारे यांनी केलाय.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.