MPSC परीक्षेसंदर्भात समिती गठीत केली जाणार, स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणाची राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

| Updated on: Jul 04, 2021 | 9:24 PM

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तसंच एमपीएससी परीक्षेबाबत एक समिती गठीत केली जाणार असल्याचं कळतंय.

MPSC परीक्षेसंदर्भात समिती गठीत केली जाणार, स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणाची राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा
राज्य मंत्रिमंडळ बैठक
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे पुण्यातील तरुण स्वप्निल लोणकर याने आत्महत्या केलीय. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपनंही सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. अशावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तसंच एमपीएससी परीक्षेबाबत एक समिती गठीत केली जाणार असल्याचं कळतंय. (Swapnil Lonakar’s suicide discussed in state cabinet meeting)

स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणावरुन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर महाविकास आघाडी सरकार चांगलंच अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सरकारच्या नाकर्तेपणामुळेच स्वप्निलने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वप्निलच्या आत्महत्येबाबत चर्चा करण्यात आली. एमपीएससी परीक्षा संदर्भात राज्य सरकार एक समिती गठीत करणार आहे. ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करुन शासनाला अहवाल सादर करणार आहेत, अशी माहिती आता मिळतेय.

नियुक्ती मिळत नाही, पुण्यात स्वप्निल लोणकरची आत्महत्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. पीडित तरुण स्वप्नील लोणकरने पुण्यातील फुरसंगी येथे आत्महत्या केली. ही घटना 29 जून रोजी घडली.

सरकारच्या नाकर्तेपणामुळेच स्वप्निलची आत्महत्या

“सध्या महाराष्ट्रमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडे मोडलं आहे. अशा परिस्थितीत आपली कमावती मुलं हा घरच्यांसाठी आधार असतो. पण अशा काळात जर सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्ती मुली सोडून गेली तर कुटुंबीयांनी काय करायचं? आम्ही तर म्हणू की सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केलीय”, असा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केलाय.

संबंधित बातम्या :

‘दिरंगाई’ हा एमपीएससीचा आवडता ‘उद्योग’, ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवा; अमित ठाकरेंचा संताप

MPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न एक महिन्यात सोडवू, स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर वडेट्टीवारांचं आश्वासन

Swapnil Lonakar’s suicide discussed in state cabinet meeting