बाळासाहेब ते बाबासाहेब, कोणी कोणाला स्मरुन शपथ घेतली?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली (Swearing in Ceremony of Ministers). त्यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्याही प्रत्येकी दोन मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

बाळासाहेब ते बाबासाहेब, कोणी कोणाला स्मरुन शपथ घेतली?
Follow us
| Updated on: Nov 28, 2019 | 9:27 PM

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली (Swearing in Ceremony of Ministers). त्यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्याही प्रत्येकी दोन-दोन मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी या मंत्र्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींना स्मरुन शपथ घेतली (Swearing in Ceremony of Ministers). प्रत्येकाने घेतलेल्या या शपथांमधील बारकावे उपस्थितांसह राज्यातील नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहेत.

उद्धव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि माझ्या आई वडिलांचं स्मरुन मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की…

एकनाथ शिंदे

मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन धर्मवीर आनंद दिघे यांचं स्मरण करुन आई वडिलांच्या पुण्याईने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो…

सुभाष देसाई

“छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन मी सुभाष राजाराम देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की…”

जयंत पाटील

“आदरणीय शरद पवार यांना वंदन करुन मी जयंत कुसुम राजाराम पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की…”

छगन भुजबळ

“जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर सावित्रीमाता फुले यांना वंदन करतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करतो. आदरणीय शरद पवार यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सामिल होण्यासाठी शपथ घेतो. मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की…”

बाळासाहेब थोरात

“आदरणीय सोनिया गांधी यांच्या आशिर्वादाने मी शपथ घेत आहे मी विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…”

नितीन राऊत

“परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम वंदन करतो आणि आदरणीय सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या आशिर्वादाने मी डॉ. नितीन तुळजाबाई काशिनाथ राऊत तथागत भगवान बुद्ध साक्ष शपथ घेतो की…”

(Swearing in Ceremony of Uddhav Thackeray and other ministers)

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.