TET Scam: टीईटी घोटाळ्यातही आता ED ची एन्ट्री, मनी लॉड्रींगचा तपास करणार

| Updated on: Aug 08, 2022 | 3:46 PM

टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी ईडीने टीईटी परीक्षा, आरोग्य विभाग परीक्षा एएमडी म्हाडा परीक्षेशी संबंधित पुणे पोलिसांकडे दाखल झालेल्या घोटाळ्यांची माहिती मागवली.

TET Scam: टीईटी घोटाळ्यातही आता ED ची एन्ट्री, मनी लॉड्रींगचा तपास करणार
TET Exam Scam
Follow us on

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) टीईटी (Teachers Eligibility Test) घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी ईडीने टीईटी परीक्षा, आरोग्य विभाग परीक्षा एएमडी म्हाडा परीक्षेशी संबंधित पुणे पोलिसांकडे दाखल झालेल्या घोटाळ्यांची माहिती मागवली. शिक्षक पात्रता परीक्षा (TET Scam) या घोटाळ्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जारी करण्यात आली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख यांची नावे या यादित असल्याचे समोर आले.आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची ही नावं आहेत. याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. आता या संदर्भातली नवीन माहिती समोर येत आहे. या संदर्भातील चौकशी अंमलबजावणी संचालनालय, ईडी करणार असल्याचं समोर आलंय.

ANI ट्विट

“महाराष्ट्र | टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय” अशा आशयाचं ट्विट ANI संस्थेने केलं आहे.

काय म्हणाले शरद गोसावी?

  • मार्च 2019 मध्ये झालेल्या टिईटी परिक्षेचा निकाल 2022 ला लागला होता. 16,705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
  • शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक हे या प्रकरणात पुढील कारवाई करतील
  • 293 जणांना बनावट प्रमाणपत्र दिले गेले होते पुणे सायबर पोलिसांकडून ही माहिती आली यातून विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द केली गेली
  • 2021 मध्ये घोटाळा उघड झाला. ज्यात 7 हजार 880 संशयित विद्यार्थ्य्यांची यादी रद्द केली. त्यांची नेमणूक रद्द केली.

शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक या प्रकरणात पुढील कारवाई करणार

दरम्यान याचसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) म्हणाले, मार्च 2019 मध्ये झालेल्या टीईटी परिक्षेचा निकाल 2020 ला लागला होता. 16,705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक हे या प्रकरणात पुढील कारवाई करतील.