TMC Election 2022 Ward 12 | ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेनेला करावी लागणार तारेवरची कसरत!

ठाणे महापालिकेची लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,26,003 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42,698 एवढी आहे. महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 142 आहे. ठाणे महापालिकेत एकूण 47 प्रभाग आहेत.

TMC Election 2022 Ward 12 | ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेनेला करावी लागणार तारेवरची कसरत!
TMC Election 2022 Ward 12
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 06, 2022 | 4:17 PM

मुंबई : यंदाच्या वर्षी राज्यात महापालिकेच्या निवडणूकीचे (Election) बिगुल वाजल्याने सर्वचजण कामाला लागले आहेत. यंदा संपुर्ण राज्याचे लक्ष ठाणे महापालिकेच्या निवडणूकीवर आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांनासोबत घेत मोठी बंडखोरी केली. त्यांच्या या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र आता महापालिका निवडणूका (Municipal election) देखील तोंडावर असल्याने मोठी तारेवरची कसरत शिंदे गटाला ठाणे महापालिका आपल्याकडे ठेवण्यासाठी करावी लागणार आहे. शिंदे गटाचे ठाणे महापालिकेवर वर्चस्व बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे (Shiv Sena) अनेक नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मात्र, शिवसेनेचीच ठाणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना देखील तारेवरची कसरत करणार. मात्र, एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असल्याचे त्यांचे महापालिकेत वर्चस्व बघायला मिळते.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

ठाणे महापालिका प्रभाग 12 मधील निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष

ठाणे महापालिका प्रभाग 12 मधील निवडणूकीकडेही सर्वांचे लक्ष आहे. प्रभाग 12 मध्ये दरवेळी निवडणूकी ही चुरशीची ठरते. प्रभाग 12 मधून 2017 ला गट अ मधून पवार नारायण शंकर हे निवडून आले होते. प्रभाग 12 मधून गट ब मधून विचारे नंदिनी राजन निवडून आल्या. प्रभाग 12 मधून गट क मधून मोरे रुचिता राजेश निवडून आल्या. प्रभाग 12 मधून गट क मधून राउळ अशोक राजाराम निवडूल आले. आता प्रभागातील समिकरणे बदलली आहेत. यंदा निवडून घेण्यासाठी सर्वांनाच मोठी कसरत करावी लागणार हे नक्की आहे.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

ठाणे महापालिकेची लोकसंख्या 18,41,488 इतकी

ठाणे महापालिकेची लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,26,003 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42,698 एवढी आहे. महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 142 आहे. ठाणे महापालिकेत एकूण 47 प्रभाग आहेत. त्यात तीन सदस्यीय प्रभाग 46 असून चार सदस्यी प्रभाग एक आहे. महापालिकेत अनुसूचित जातीसाठी 10 तर अनुसूचित जमातीसाठी तीन जागा राखीव आहेत. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तर डॉ. विपीन शर्मा हे महापालिकेचे आयुक्त आहेत.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

प्रभाग क्रमांक 12 कुठून कुठपर्यंत जाणून घ्या

प्रभाग क्रमांक 12 मध्ये रेप्टाकोस कंपनीपासून कंपाउंड भितीने श्रेयस गुप्ता यांच्या घरापर्यंत आणि त्यानंतर गल्लीने प्रकाश आंबवणे यांच्या घरापर्यंत आणि त्यानंतर गल्लीने मुक्ता कांबळे यांच्या घरापर्यंत आणि त्यानंतर संभाजी भोसले यांच्या घरापर्यंत आणि त्यानंतर नाल्याने लक्ष्मी पार्क इमारत क्र. 3 आणि त्यानंतर लक्ष्मी पार्क इमारत क्र. 3 आणि 4 पर्यंत इमारत आणि त्यानंतर इमारत क्र. 5 आणि 6 मध्ये रस्त्यापर्यंत आणि त्यानंतर रस्त्याने दक्षिणेकडे शिव श्रद्धा बंगल्याच्या कंपाऊंड भितीपर्यंत आणि त्यानंतर बंगल्याच्या कंपाऊंड भितीने क्रोम पार्कच्या कंपाउंड भितीपर्यंत आहेत.