दिल्ली हिंसाचार सुनियोजित कट, अमित शाहांनी राजीनामा द्यावा, मोदी-केजरीवालांना 5 प्रश्न : सोनिया गांधी

| Updated on: Feb 26, 2020 | 1:51 PM

दिल्लीतील हिंसाचार हा सुनियोजित कट होता. त्यासाठी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह (Sonia Gandhi demands Amit Shah resignation ) जबाबदार आहेत, असा आरोप सोनिया गांधींनी केला.

दिल्ली हिंसाचार सुनियोजित कट, अमित शाहांनी राजीनामा द्यावा, मोदी-केजरीवालांना 5 प्रश्न : सोनिया गांधी
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचार हा सुनियोजित कट होता. त्यासाठी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह (Sonia Gandhi demands Amit Shah resignation ) जबाबदार आहेत. या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारुन त्यांनी राजीनामा द्यावा,  अशी मागणी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली.  सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेऊन, माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकार  आणि दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारवर हल्ला चढवला.(Sonia Gandhi demands Amit Shah resignation )

दिल्लीतील हिंसा गंभीर आहे. यामुळे आम्ही तातडीची बैठक घेतली.दिल्लीतील हिंसाचार हे एक षडयंत्र आहे. भाजपकडून हिंसा भडकविली गेली.भाजप नेत्यांवर कारवाई न केल्याने हिंसा झाली आहे. ईशान्य दिल्लीमध्ये हिंसा पसरली आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

काँग्रेस पक्ष मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांसोबत आहे. दिल्ली हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकार आणि गृहमंत्री जबाबदार आहेत. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनिया गांधींनी केली. याशिवाय दिल्लीतील केजरीवाल सरकारने योग्यरित्या हिंसाचार हाताळला नाही, असाही आरोप त्यांनी केला.

यावेळी सोनिया गांधींनी पाच प्रश्न विचारले

1-रविवारी पासून गृहमंत्री कुठे होते आणि काय करत होते?

2-दिल्लीचे मुख्यमंत्री कुठे होते?

3- सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या?

4-दिल्ली पोलिसांनी वेळीच उपाय का केले नाहीत?

5-संसदीय फोर्सला का बोलावले नाही?

सोनिया गांधी नेमकं काय म्हणाल्या?

दिल्लीतील सद्यस्थिती चिंताजनक आहे. एका सुनियोजित कटामुळे हिंसाचार भडकला. भाजप नेत्यांनी चिथावणीखोर भाषणं केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी द्वेष पसरवला. दिल्लीतील या परिस्थितीला केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

देशातील जनतेने दिल्ली निवडणुकीवेळीही सर्वकाही पाहिलं. भाजप नेत्यांनी चिथावणीखोर विधाने करुन, लोकांना भडकवलं. वेळीच कारवाई न झाल्याने लोकांचे जीव गेले. दिल्लीतील एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यायला हवा. दिल्ली सरकार सुद्धा शांतता राखण्यास अपयशी ठरली.

गृहमंत्र्यांनी सांगावं की रविवारी ते कुठे होते आणि काय करत होते? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांमध्ये जायला हवं होतं. भाजपच्या नेत्यांवर आतापर्यंत कारवाई का झाली नाही? निमलष्करी दलाला का पाचारण केलं नाही? केंद्र आणि दिल्ली सरकारमधील नेत्यांनी समोर येणे आवश्यक होतं.

वाजपेयी सरकारच्या काळात मी विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी काही अडचणी आल्या तर ते स्वत: सर्वपक्षीय नेत्यांशी बातचीत करत होते. मात्र मला खेद आहे की मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अशाप्रकारच्या बैठकाच होत नाहीत. आता अमित शाहांनी तीन दिवसानंतर दिल्लीच्या प्रतिनिधींची बैठक बोलवत आहेत, असं सोनिया गांधी म्हणाल्या.