राष्ट्रवादीचे 10 ते 15 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात; मंत्री उदय सामंत यांचा खळबजनक दावा

शिंदे गटातील आमदार नाराज होऊन, सरकार पडेल असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले होते.

राष्ट्रवादीचे 10 ते 15 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात; मंत्री उदय सामंत यांचा खळबजनक दावा
| Updated on: Oct 17, 2022 | 12:17 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे 10 ते 15 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. मंत्री उदय सामंत यांनी हा खळबजनक दावा केला आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं, शिंदे गटातील आमदार नाराज होऊन, सरकार पडेल असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अजित पवार चुकीचं बोलत असून उलट राष्ट्रवादीचेच 10 ते 15 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे उदय सामंत म्हणाले.

आपल्या कार्यकर्त्यांना ताकद द्यावी म्हणून कदाचित अजित पवार  आम्ही सगळे नाराज आहोत की आमच्यातले आमदार नाराज आहेत अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत.

आम्ही नाराज आहोत किंवा आम्ही काहीतरी नाराजी सारखं करतोय असं सांगण्यापेक्षा आपल्याकडनं जे काही लोक या शिंदे आणि फडणवीस यांच्या  संपर्कात आहेत त्यांना थांबवण्यासाठी केलेली ही वक्तव्य असल्याचेही उदय सामंत म्हणाले.