AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य आणि उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, राहुल गांधींसोबत डिनर डिप्लोमसी, काय चर्चा होणार?

दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तसेत ते दिल्लीत राहुल गांधींची भेटही घेणार आहेत.

आदित्य आणि उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, राहुल गांधींसोबत डिनर डिप्लोमसी, काय चर्चा होणार?
rahul-gandhi-uddhav-thackeray-2
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 05, 2025 | 10:28 PM
Share

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे हेही असणार आहेत. हे दोन्ही नेते राहुल गांधी यांची वैयक्तिक भेटही घेणार आहेत. राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं आहे, त्यासाठी आम्ही दिल्लीला जात आहोत अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

इंडिया आघाडीची बैठक

समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 7 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यात दोघांमध्ये बैठकीच्या रणनीतीवर आणि संभाव्य विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत, त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

बैठकीत काय चर्चा होणार?

इंडिया आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यात जागावाटपाचा मुद्दा महत्वाचा असणार आहे. त्याच बरोबर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याबरोबर आगामी निवडणूकीत भाजपविरोधी वातावरण तयार करण्यासाठी काय करावे लागेल याबाबतही चर्चा होणे अपेक्षित आहे.

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा कसा असेल?

6 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचतील. त्यानंतर ते संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. 6 ऑगस्ट रोजीच्याच संध्याकाळी उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते 6 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ते पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता संसदेतील पक्ष कार्यालयाला भेट देतील. दुपारी ते राजकीय गाठीभेटी घेतील. 7 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनर आणि इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच