Uddhav Thackeray : रक्त सांडवून मुंबई मिळवलीय, कोश्यारींनी आंदण दिलेली नाही; उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना फटकारले

| Updated on: Jul 30, 2022 | 2:04 PM

राज्यपालांची भाषण कोण लिहून देत माहित नाही. विशेष म्हणजे त्यांची भाषणे दिल्लीतून येतात की मुंबईत लिहिली जातात हे माहित नाही. महाराष्ट्राचा इतिहास देशाला माहित आहे.

Uddhav Thackeray : रक्त सांडवून मुंबई मिळवलीय, कोश्यारींनी आंदण दिलेली नाही; उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना फटकारले
रक्त सांडवून मुंबई मिळवलीय, कोश्यारींनी आंदण दिलेली नाही; उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना फटकारले
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई – राज्यपालांनी (Governor) काल एका कार्यक्रमात महाराष्ट्राबाबत (Maharashtra) चुकीचं वक्तव्य केल्यापासून त्यांच्यावरती राजकीय नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्यपाल यांनी यांच्या आगोदर सुध्दा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आहे. काल त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावरती महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबई ही मराठी माणसांनी रक्त सांडवून मिळविली आहे. त्याचबरोबर कोश्यारींनी आदण म्हणून दिलेली नाही असा टोला राज्यपालांना लगावला. भाजपने मात्र आता सावध पवित्रा घेतला असून आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे. सध्याच्या सरकारने राज्यापालांविषयी योग्य भूमिका घेतली पाहिजे. ते पार्सल कुठून आणलं ते तिकडं पाठवलं पाहिजे असा टोला ठाकरेंनी भाजपाला लगावला.

राज्यपालांनी पदाची शान घालवली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पदाची शान घालवली आहे. सीएनआरसीच्यावेळी दंगली झाल्या नव्हत्या. ते सुद्धा काम आम्ही केलं आहे. तुम्ही का आगी लावता असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना केला आहे. विशेष म्हणचे मी राज्यपाल या पदाचा मान राखतो. परंतु त्यांनी त्या पदाचा मान राखावा, तेचं जर त्या पदाची शान राखत नसतील तर इतरांनी काय करावे. त्यांनी काल केलेलं विधान हे त्यांनी मुखातून बाहेर पडलंय की त्यांना कुणी मुद्दाम करायला लावलंय असंही त्यांनी आपल्या पत्रकारपरिषदेत सांगितले.
महाराष्ट्रात मतांचं ध्रुवीकरण करायचं आहे. त्यासाठीच हे सर्व सुरू केलं आहे. महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. त्यासाठीच हे सर्व सुरू आहे. राज्यपालांनी माफी मागावी असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मुंबई कोश्यारींनी आंदण दिलेली नाही

राज्यपालांची भाषण कोण लिहून देत माहित नाही. विशेष म्हणजे त्यांची भाषणे दिल्लीतून येतात की मुंबईत लिहिली जातात हे माहित नाही. महाराष्ट्राचा इतिहास देशाला माहित आहे. पण त्याची जाणीव सध्याच्या राज्यपालांना अजिबात नाही. ही मुंबई कोश्यारींनी आंदण दिलेली नाही. तर ही संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यातून मिळालेली मुंबई आहे. मुंबईत फक्त 105 हुतात्मे नव्हते. एका परदेशी पत्रकाराने एक पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये त्याने दोन अडीचशे मृतदेह असल्याचा आकडा दिला आहे. राज्यपालांनी चुकीचं वक्तव्य केलं आहे. तसेच मराठी माणसाचा अपमान केला आहे.