Uddhav Thakceray : गोकुळच्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंची एन्ट्री; सतेज पाटलांना थेट फोन करुन म्हणाले…

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा तिढा कायम असतानाच आता या संघर्षात उद्धव ठाकरे यांनीही भूमिका घेतली आहे. सतेज पाटील यांना फोन करून त्यांनी पाठिंबा दर्शवला. राज्य सरकारने आता चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Uddhav Thakceray : गोकुळच्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंची एन्ट्री; सतेज पाटलांना थेट फोन करुन म्हणाले...
Uddhav Thackeray Supports Satej Patil For Gokul Power
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 3:05 PM

गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात आता राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरू लागल्या आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमधील बहुमताच्या मुद्द्यावरून राज्य सरकारविरोधात भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वासही त्यांनी दिला. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षाला आता नवे राजकीय वळण मिळाले आहे.

नेमकं काय घडतंय?

गोकुळमध्ये आता राज्य सरकारकडून चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध संघाच्या निवडणुकीमध्ये बहुमतासाठीचा आकडा गाठता आला नसल्याने अध्यक्ष निवड करणं कठिण बनलं होतं. त्यापार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पण या निर्णयावर आता विरोधकांकडून जोरदार टीका सुरु झाली आहे. राहुल गांधी यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. त्याशिवाय शिंदेंची शिवसेनाही गोकुळबाबत घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या विरोधात असल्याची आणि त्यावरुन नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading...

उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून कोल्हापुरातील राजकारण तापले आहे. दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकत बहुमत मिळवले होते. तर महायुतीच्या वाट्याला 12 जागा आल्या होत्या. मात्र, निवडणुकीनंतर शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा निर्णय झाल्याने अध्यक्षपदाच्या निवडीचे राजकीय गणित बदलले आहे.

या निर्णयाला सतेज पाटील यांनी विरोध केला असून, लोकशाही पद्धतीने मिळालेला कौल डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील राजकीय नेते आणि माध्यमांनाही या प्रश्नावर आवाज उठवण्याचे आवाहन केले होते.

ठाकरे गट सतेज पाटलांच्या पाठीशी

दरम्यान, या संघर्षात आता उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी थेट फोन करून सतेज पाटील यांच्याशी संवाद साधला. गोकुळच्या लढाईत शिवसेना ठाकरे गट तुमच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास दिला.

गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीने बहुमत मिळवल्यानंतरही अध्यक्षपदाचा तिढा कायम आहे. या प्रकरणी न्यायालयीन लढाईही सुरू आहे. दुसरीकडे, 9 नोव्हेंबरला सतेज पाटील यांनी कोल्हापुरात संघर्ष मोर्चाची घोषणा केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us