AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना 1996 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी बाळासाहेबांना…. आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट

मुख्यमंत्री बनण्याची उद्धव ठाकरे यांची अतृप्त इच्छा महाविकास आघाडी सरकार मध्ये पूर्ण झाली

उद्धव ठाकरे यांना 1996 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी बाळासाहेबांना.... आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट
| Updated on: Oct 01, 2022 | 6:30 PM
Share

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) आणि शिवसेनेबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे(Chandrakat Khaire) यांनीही एक गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली होती. यानंतर आता उद्धव ठाकरेंबाबत(Uddhav Thackeray) आणखी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री सुरेश नवले(suresh nawale) यांनी एक राजकीय बॉम्ब टाकला आहे.

उद्धव ठाकरे यांना 1996 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होते असा खळबळजनक गौप्यस्फोट सुरेश नवले यांनी केला आहे. यावेळी शिवसेना सत्तेत होती आणि सुरेश नवले हे मंत्री होते.

उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मित्र अश्विन शेट्टी यांच्या मार्फत आमदारांना मुख्यमंत्रीपदाबाबत सांगितले होते. मला मुख्यमंत्री करा म्हणून उद्धव यांनी आम्हाला बाळासाहेबांना सांगण्यास भाग पाडले असा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरेंसह खोटं बोललो. चंद्रकांत खैरे, अर्जुन खोतकर आणि मी बाळासाहेबांना त्यावेळी याबाबत सांगितले होते असे नवले म्हणाले.

मुख्यमंत्री बनण्याची उद्धव ठाकरे यांची अतृप्त इच्छा महाविकास आघाडी सरकार मध्ये पूर्ण झाली असा टोला देखील नवले यांनी लगावला. 2014 मध्ये राज्यात युतीचे सरकार असताना सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता.

सत्ता स्थापनेबाबातच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते. प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याबाबत सुचवलं होतं असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला होता.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी याला दुजोरा दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दहा ते पंधरा आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा गौप्यस्फोट खैरे यांनी केला होता. आमदार संजय शिरसाट यांनीच मला याबद्दल सांगितले होते असेही खैरे म्हणाले होते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.