काँग्रेस नेत्यांचा सल्ला ऐकला; उद्धव ठाकरे आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत

| Updated on: Aug 13, 2022 | 5:38 PM

विधान परिषदेतील संख्याबळाचा विचार करत उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती. मात्र काँग्रेस नेत्यांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय त्यांनी बदलला असून उद्धव ठाकरे आमदार म्हणून कायम राहणार आहेत.

काँग्रेस नेत्यांचा सल्ला ऐकला; उद्धव ठाकरे आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath Shinde ) यांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठा झटका दिला. महाराष्ट्रात झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी आमदारकीचा(MLA) राजीनामा देणारे असल्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेस नेत्यांच्या सल्ल्यानुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांचा हा निर्णय मागे घेतला आहे. उद्धव ठाकरे आता आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत.

एक एक आमदार महत्त्वाचा

40 पेक्षा जास्त आमदार शिंदे गटात सामील झाल्याने विधान परिषदेतील आमदारांचे गणित बिघडले आहे. त्यामुळे एक एक आमदार महत्त्वाचा आहे. अशातच विधान परिषदेतील संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊ नये असा सल्ला काँग्रेस नेत्यांनी दिला होता. या सल्ल्याचा विचार करत उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय बदललला आहे.

विधान परिषदेतील संख्याबळाचा विचार करत उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती. मात्र काँग्रेस नेत्यांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय त्यांनी बदलला असून उद्धव ठाकरे आमदार म्हणून कायम राहणार आहेत.

शिंदेनी केला राजकीय भूकंप

एकनाथ शिंदे 40 पेक्षा अधिक आमदारांना आपल्या सोबत घेऊन प्रथम सुरत आणि मग गुवाहाटीला गेले. या नंतर उद्धव ठाकरेंनी या आमदारांना परत येण्याचे आव्हान केले. मात्र, हे आमदार आपल्या मतावर ठाम होते. या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले.

राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन

आमदारांना गुहावटीलाच ठेवून एकनाथ शिंदे एकटेच मुंबईत दाखल झाले. यानंतर राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर या दरम्यान उद्धव ठाकरे एकदाही सभागृहात दिसले नाहीत. मात्र आता त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सभागृहात दिसणार आहेत.