Umc election 2022 Ward 21 : महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता, प्रभाग क्रमांक 21 वर मात्र भजपाचे वर्चस्व, यंदा बदलणार का समिकरणे..!

महापालिकेच्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर अवलंबून असतात. पक्षापेक्षा स्थानिक पातळीवरील नेतृ्त्वाकडे मतदरांचा कल असतो. उल्हासनगर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता असली तर प्रभाग क्रमांक 21 मध्ये मात्र, भाजपाला यश मिळाले होते. 2014 राज्यात मोदी लाट निर्माण झाली होती. त्याचा परिणाम अनेक महापालिका निवडणुकांवर झाला असला तरी या महापालिकेत भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते.

Umc election 2022 Ward 21 : महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता, प्रभाग क्रमांक 21 वर मात्र भजपाचे वर्चस्व, यंदा बदलणार का समिकरणे..!
उल्हासनगर महापालिका
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 1:39 PM

उल्हासनगर : राज्यात महाविकास आघाडी सरकार हे 2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर अस्तित्वात आले असले तरी (Ulhasnagar Municipal) उल्हासनगर महापालिकेत 2017 च्या (Election) निवडणुकीपासूनच राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना मिळून सत्ता स्थापन झाली आहे. मात्र, त्यानंतर राज्यातील राजकीय समिकरणात मोठा बदल झाला असून त्याचा परिणाम आता (local bodies) स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कसा होणार हे पहावे लागणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नव्हे तर आता शिंदे गट आणि भाजपाची सत्ता आहे. याचे परिणाम नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवरही पाहवयास मिळाले आहेत. उल्हासनगर महिपालिकेवर जरी महाविकास आघाडीची सत्ता असली तरी वार्ड क्रमांक 21 भाजपाने आपला करिश्मा दाखवला होता. या वार्डात भाजपाच्या रेखा अशोक ठाकुर ह्या निवडणु आल्या होत्या. आता राज्यातील सत्तांतरानंतर भाजपाला आणखी बळ मिळणार हे स्पष्ट आहे तर शिंदे गटाची भूमिका काय राहते हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे असणार आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने एकत्र लढण्याची आशा शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता कायम राहणार की बदलणार हे पहावे लागणार आहे.

उल्हासनगर महापालिकेचे चित्र

उल्हासनगर महापालिकेत एकूण 89 नगरसेवक आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी एक आणि महिलांसाठी 36 जागा राखीव आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 30 प्रभाग आहेत. उल्हासनगरची लोकसंख्या 5 लाख 06 हजार 098 एवढी आहेत. त्यात महिलांची संख्या 2 लाख 69 हजार 048 एवढी असून पुरुषांची संख्या 2 लाख 37 हजार 050 एवढी आहे. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे.

प्रभाग क्रमांक 21 चे वेगळेपण

महापालिकेच्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर अवलंबून असतात. पक्षापेक्षा स्थानिक पातळीवरील नेतृ्त्वाकडे मतदरांचा कल असतो. उल्हासनगर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता असली तर प्रभाग क्रमांक 21 मध्ये मात्र, भाजपाला यश मिळाले होते. 2014 राज्यात मोदी लाट निर्माण झाली होती. त्याचा परिणाम अनेक महापालिका निवडणुकांवर झाला असला तरी या महापालिकेत भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते. त्यामुळे सत्तांतर झाले नसले तरी भाजपाचे वजन निर्माण झाले आहे. 2017 मध्ये वार्ड पद्धतीने निवडणुका पार पडल्या होत्या. आता प्रभागनिहाय निवडणुका होणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून तयारी सुरु झाली असली प्रत्यक्ष निवडणुका केव्हा होणार हे अद्यापही निवडणुक आयोगानै स्पष्ट केलेले नाही.

प्रभाग क्र. 21 चे असे आहे स्वरुप

प्रभाग आणि तेथील स्थानिक नेतृत्व यावरच सर्वकाही अवलंबून असते. महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता असली या 21 नंबर प्रभागात भाजपाचे उमेदवार रेखा अशोक ठाकुर ह्या विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 21 ची लोकसंख्या ही 15 हजार 587 एवढी आहे. तर यामध्ये अनुसूचित जातीची 2 हजार 890 तर अनुसूचित जमातीची 183 असे मतदार आहेत. त्यामुळे येथील उमेदवाराचे भवितव्य हे खुल्या वर्गावरच अवलंबून आहे. निवडणुक कार्यक्रम समोर आला नसला तरी इच्छूक उमेदवार हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

प्रभागाची व्याप्ती ही अशी

निवडणुक आयागोच्या सूचनांवरुन प्रभागाची हद्द ही ठरवून घेण्यात आली आहे. त्यानुसार सर्वतोपरी तयारीही झाली आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये शहरातील रेल्वे स्थानक परिसर, टागोर सोसायटी, चंद्रमणी बुद्धविहार, डॉ. अहिरे हॉस्पीटल, जागृती कॉलनी परिसर,शिवशक्ती कॉलनी परिसर, महात्मा फुले नगर, भीम कॉलनी, इंदिरा नगर, मराठा कॉलनी, आदर्श नगर, समता नगर, वाल्मिकी नगर, कच्छीपाडा, कामेश्वर महादेव मंदिर परिसर याचा प्रामुख्याने समावेश होत आहे. प्रभाग हद्द ठरवून दिल्यानंतर हे स्पष्ट झालेले आहे.

उल्हासनगर महापालिका प्रभाग 21 अ

पक्षउमेदवार विजयी/ आघाडी
भाजपा
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

उल्हासनगर महापालिका प्रभाग 21 ब

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजपा
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

उल्हासनगर महापालिका प्रभाग 21 क

पक्ष उमेदवारविजयी/ आघाडी
भाजपा
शिवसेना
राष्ट्रावादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

प्रभागातील वार्डाचे असे आरक्षण

आरक्षणावरही उमेदवराचे भवितव्य अवलंबून राहते. महापालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागातील आणि प्रभागाच्या वार्डातील आरक्षण जाहिर केलेले आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 21 मधील वार्ड अ हा अनुसूचित जातीतील महिलेसाठी राखीव असणार आहे. तर ब मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी आरक्षण आहे. तर क प्रभागत सर्वसाधारण महिलेला आपले राजकीय भवितव्य आजमवावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.