Kapil Patil : शिंदे सरकारमध्ये सर्व मंत्री समाधानी, केंद्रीय मंत्री कपिल पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमके कारण काय?

केंद्रीय मंत्री यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणे यामध्ये विशेष काय नाही. पण कपिल पाटील थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला यामध्ये बरेच काही आहे. कारण ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना नगरविकास मंत्रीपद देण्यात आले होते. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे यांचा सामना करता यावा म्हणूनच भाजपाने कपिल पाटील यांना मंत्रीपद दिले होते.

Kapil Patil : शिंदे सरकारमध्ये सर्व मंत्री समाधानी, केंद्रीय मंत्री कपिल पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमके कारण काय?
केंद्रीय मंत्री कपिल पाटील
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 11:05 PM

मुंबई :  (Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खाते वाटपावरुन शिंदे गट आणि भाजपामध्ये मतभेद आहेत शिवाय भाजपाने सर्व महत्वाची खाती आपल्याच पक्षाकडे ठेवली आरोपही होत आहे. पण शिंदे गटात सर्वकाही अलबेल आहे. विरोधकांना त्याची चिंता नसावी तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेली जाबाबदारी सर्वच मंत्रि यशस्वीरित्या पार पाडतील असा विश्वास (Kapil Patil) केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. कपिल पाटील हे (Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. त्यांनी मुलाच्या दहीहंडी उत्सवाला यावे असे आमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. शिवाय राज्यात आता शिंदे आणि फडणवीस सरकारच्या काळातच खऱ्या अर्थाने विकास होणार असल्याचेही पाटील म्हणाले आहेत.

म्हणून कपिल पाटील अन् मुख्यमंत्र्याच्या भेटीला महत्व

केंद्रीय मंत्री यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणे यामध्ये विशेष काय नाही. पण कपिल पाटील थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला यामध्ये बरेच काही आहे. कारण ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना नगरविकास मंत्रीपद देण्यात आले होते. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे यांचा सामना करता यावा म्हणूनच भाजपाने कपिल पाटील यांना मंत्रीपद दिले होते. पण आता शिंदे गट आणि भाजपच्या एकीमुळे हा विरोध काही उरलाच नाही. अशी परस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रथमच पाटील हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला गेले होते.

मुख्यमंत्र्यांना दहीहंडीचे आमंत्रण

कपिल पाटील हे भिवंडी मतदार संघाचे खासदार आहेत. 2014 साली त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला राम-राम करीत भाजप पक्षात प्रवेश केला होता. आता मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यापासून त्यांची भेट झाली नव्हती पण आता दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री यांनी भिवंडी मतदार संघात हजेरी लावावी म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या मुलाच्या माध्यमातून हा उत्सव मोठा असतो. त्याला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित रहावे आणि त्याचेच आमंत्रण देण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मंत्रिमंडळात सर्वजण हे समाधानी

शिंदे आणि फडणवीस सरकारच्या माध्यमातुनच खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होणार आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी वाटप केलेल्या खात्यावरुन कोणीही नाराज नसून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या अनुशंगाने विरोधकांकडून असे आरोप केले जात आहेत. पण या आरोपामध्ये तथ्य काही नसून नवीन सर्वच मंत्री हे आपली जाबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.