AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषदेसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल, भाजपकडून सहा, तर राष्ट्रवादीचे तीन अर्ज

राष्ट्रवादीने एक तर भाजपने दोन अतिरिक्त असे डमी उमेदवार अर्ज सादर केले. अर्ज छाननी प्रक्रिया झाल्यानंतर ते आपापली उमेदवारी मागे घेतील (Vidhan Parishad Candidature Form)

विधानपरिषदेसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल, भाजपकडून सहा, तर राष्ट्रवादीचे तीन अर्ज
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 11, 2020 | 3:19 PM
Share

मुंबई : काँग्रेसने दोन जागांचा आग्रह सोडल्याने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. मात्र तूर्तास निवडणुकीसाठी एकूण 12 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. भाजपने सहा, तर राष्ट्रवादीने तीन उमेदवारी अर्ज भरले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही सहकुटुंब हजेरी लावत उमेदवारी अर्ज दाखल केला. (Vidhan Parishad Candidature Form)

भाजप चार, शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेस एका जागेसाठी निवडणूक लढवणार आहे. मात्र राष्ट्रवादीने एक तर भाजपने दोन अतिरिक्त असे डमी उमेदवार अर्ज सादर केले. अर्ज छाननी प्रक्रिया झाल्यानंतर ते आपापली उमेदवारी मागे घेतील. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांची लगबग सुरु होती.

डमी उमेदवार कोण?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून किरण पावसकर यांनी डमी उमेदवार अर्ज सादर केला. तर भाजपकडून संदीप लेले आणि रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. हेसुद्धा डमी उमेदवार आहेत.

कोणत्या पक्षाकडून किती उमेदवारी अर्ज?

भाजप – 6 राष्ट्रवादी – 3 शिवसेना – 2 काँग्रेस 1

कोणत्या पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण?

उद्धव ठाकरे – शिवसेना निलम गोऱ्हे – शिवसेना

राजेश राठोड – काँग्रेस राजकिशोर मोदी – काँग्रेस

(Vidhan Parishad Candidature Form)

शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी अमोल मिटकरी – राष्ट्रवादी

रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप गोपीचंद पडळकर – भाजप प्रवीण दटके – भाजप डॉ. अजित गोपछेडे – भाजप

काँग्रेसने दोन जागांचा आग्रह सोडल्याने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्गही मोकळा झाला. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि मुख्यमंत्र्यांचा आदर करत काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेऊन एकाच जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीचे पाच, तर भाजपचे चार उमेदवार बिनविरोध विधानपरिषदेवर निवडून जाणार असल्याचं काल (रविवारी) स्पष्ट झालं.

कुणाचं संख्याबळ काय?

सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. तर मित्रपक्षांच्या साथीने चौथी जागाही भाजप जिंकू शकतो.

पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे.

संबंधित बातम्या :

MLC Polls | विधानपरिषदेच्या नऊ रिक्त जागा, दहा उमेदवार, कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट?

MLC Polls | विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार जाहीर

MLC Polls | असंच चालू राहिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही, उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेसला निरोप : सूत्र

MLC Polls | राष्ट्रवादीच्या पुढे काँग्रेसचं पाऊल, दुसरा उमेदवारही जाहीर, विधानपरिषदेचं गणित बदलणार 

आधी विधानसभा, आता विधानपरिषदेला डावललं, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात दुसऱ्यांदा पाणी, दादांनी प्रॉमिस मोडल्याचा आरोप

खडसे, बावनकुळे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील : चंद्रकांत पाटील

MLC Polls : ‘मोदी गो बॅक’ म्हणणाऱ्यांना उमेदवारी, एकनाथ खडसे खवळले

MLC Polls | मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळेंच्या नावावर फुली, भाजपचे चार उमेदवार जाहीर

MLC Polls | काँग्रेस सहाव्या जागेसाठी आग्रही, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार?

(Vidhan Parishad Candidature Form)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...