खडसे, बावनकुळे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील : चंद्रकांत पाटील

सचिन पाटील

|

Updated on: May 08, 2020 | 3:41 PM

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार घोषित करुन (Chandrakant Patil on MLC election) त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.

खडसे, बावनकुळे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील : चंद्रकांत पाटील

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार घोषित करुन (Chandrakant Patil on MLC election) त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक आहे. संख्याबळ पाहता भाजपने आपले 4 उमेदवार घोषित केले. मात्र निष्ठावंतांना डावलून, बाहेरुन आलेल्यांना तिकीट दिल्याचा आरोप, दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीच केला आहे. खडसेंनी स्वत:साठी उमेदवारी मागितली होती. मात्र तिकीट न मिळाल्याने खडसे चांगलेच संतापले आहेत. (Chandrakant Patil on MLC election)

भाजपने राष्ट्रवादीतून आलेले माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, धनगर नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांच्या नावावर फुली मारल्याचं चित्र आहे.

भाजपने तिकीट दिलेल्या उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखल केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, विनोद तावडे उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “विधान परिषद निवडणुकीसाठी 4 उमेदवार घोषित केले. चारही जणांनी अर्ज भरले. भाजपमध्ये राज्याने इच्छुकांची नावे पाठवणे, केंद्राने दिलेला निर्णय पाठवणे, दिल्लीत उमेदवार पार्शवभूमी सांगितली जाते. त्यामुळे उमेदवारीबाबत केंद्राने घेतलेला हा निर्णय आहे. त्यांनी आगामी काळात विचार केला असेल”

एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा ताई यांच्याबद्दल केंद्राने काही विचार केला असेल. हे सगळे इतके चांगले कार्यकर्ते आहेत हे तिघेही समजूतदार असतील, ते स्वतःच स्वतःला समजावून सांगतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

याआधी इच्छुकांना तिकीट नाकारल्यानंतर एकनाथ खडसे यांनीही अनेकांना समजवून सांगितलं असेल, त्यामुळे ते आता स्वतःही समजून घेतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

आम्ही चार उमेदवार उभे केले कारण आमची ताकद आहे. चौथा उमेदवार हा आमचा अधिकार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या 

MLC Polls | मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळेंच्या नावावर फुली, भाजपचे चार उमेदवार जाहीर

MLC Polls : ‘मोदी गो बॅक’ म्हणणाऱ्यांना उमेदवारी, एकनाथ खडसे खवळले

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI