MLC Polls | विधानपरिषदेच्या नऊ रिक्त जागा, दहा उमेदवार, कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट?

महाविकास आघाडीने सहावा उमेदवार दिल्याने, भाजपही आणखी एक उमेदवार देऊ शकतो, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. (MLC Polls Candidate List)

MLC Polls | विधानपरिषदेच्या नऊ रिक्त जागा, दहा उमेदवार, कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट?
Follow us
| Updated on: May 10, 2020 | 2:48 PM

मुंबई : विधानपरिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी दहा उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कॉंग्रेस दोन उमेदवारांवर अडून बसल्याने सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीत तणाव असल्याचं चित्र आहे. त्यामुळे धुसफूस थांबवण्यात अपयश आलं आणि कोणीच अर्ज मागे घेतला नाही, तर निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होईल. (MLC Polls Candidate List)

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. मात्र कॉंग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्यानंतर सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीत तणाव असल्याचं समोर आलं. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. असंच सुरु राहिल्यास निवडणूक लढणार नाही, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण?

उद्धव ठाकरे – शिवसेना निलम गोऱ्हे – शिवसेना

राजेश राठोड – काँग्रेस राजकिशोर मोदी – काँग्रेस

शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी अमोल मिटकरी – राष्ट्रवादी

रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप गोपीचंद पडळकर – भाजप प्रवीण दटके – भाजप डॉ. अजित गोपछेडे – भाजप

काँग्रेसच्या पवित्र्यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 5 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून येतील असा दावा केला जात असताना, काँग्रेसने सहाव्या जागेवर दावा केला आहे. त्यानुसार आता शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसही 2 जागा लढणार आहेत.

हेही वाचा : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार जाहीर

दुसरीकडे भाजपने संख्याबळानुसार 4 जागांवर दावा केला आहे. मात्र आता महाविकास आघाडीने सहावा उमेदवार दिल्याने, भाजपही आणखी एक उमेदवार देऊ शकतो, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.

विधानपरिषदेत भाजप 3, राष्ट्रवादी काँग्रेस 3 , काँग्रेस 2 आणि शिवसेनेचे 1 सदस्य निवृत्त झाले आहेत. आता संख्याबळानुसार यंदा निवडणुकीत निवडून येण्यासाठी 29 मतांचा कोटा आवश्यक आहे.

(MLC Polls Candidate List)

कुणाचं संख्याबळ किती?

सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील.

पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेच्या 9 जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

11 मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार 12 मे – उमेदवार अर्जांची छाननी 14 मेपर्यंतची अर्जमाघारीसाठी मुदत 21 मे रोजी 9 जागांसाठी मतदान मतदानाच्या दिवशीच मतमोजणी 26 मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी कोणत्याही एका सभागृहावर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु होते. उद्धव ठाकरे यांचं नाव राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही पाठवण्यात आलं आहे. मात्र राज्यपालांनी त्याबाबत अद्याप निर्णय न घेता, त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं.

संबंधित बातम्या :

MLC Polls | असंच चालू राहिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही, उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेसला निरोप : सूत्र

MLC Polls | राष्ट्रवादीच्या पुढे काँग्रेसचं पाऊल, दुसरा उमेदवारही जाहीर, विधानपरिषदेचं गणित बदलणार 

आधी विधानसभा, आता विधानपरिषदेला डावललं, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात दुसऱ्यांदा पाणी, दादांनी प्रॉमिस मोडल्याचा आरोप

खडसे, बावनकुळे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील : चंद्रकांत पाटील

MLC Polls : ‘मोदी गो बॅक’ म्हणणाऱ्यांना उमेदवारी, एकनाथ खडसे खवळले

MLC Polls | मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळेंच्या नावावर फुली, भाजपचे चार उमेदवार जाहीर

MLC Polls | काँग्रेस सहाव्या जागेसाठी आग्रही, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार?

Vidhan Parishad Election | शिवसेनेकडून विधानपरिषदेचे उमेदवार निश्चित, उद्धव ठाकरेंसह दुसरा उमेदवारही ठरला

(MLC Polls Candidate List)

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.