WB Election 2021 Opinion Poll: पश्चिम बंगालमध्ये कोण बाजी मारणार? सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 नेटवर्कवर

| Updated on: Mar 19, 2021 | 4:28 PM

West Bengal Assembly Election 2021 opinion poll भाजप खरोखरच पश्चिम बंगाल सर करेल का? आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपला तोंड देण्यात यशस्वी?होतील का हे सांगणारा ओपिनियन पोल तुम्हाला टीव्ही 9 नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहायला मिळेल.

WB Election 2021 Opinion Poll: पश्चिम बंगालमध्ये कोण बाजी मारणार? सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 नेटवर्कवर
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी,
Follow us on

कोलकाता: पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यापैकी पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. भाजपने पश्चिम बंगालवर अधिक फोकस केला आहे. पश्चिम बंगालचं राजकारणाची हवा काय आहे? तिथलं पक्षीय बलाबल कसं राहिल? भाजप खरोखरच पश्चिम बंगाल सर करेल का? आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपला तोंड देण्यात यशस्वी?होतील का हे सांगणारा ओपिनियन पोल तुम्हाला टीव्ही 9 नेटवर्कच्या वाहिन्यांवर सायंकाळी 5 वाजता पाहायला मिळेल. (West Bengal assembly election 2021 opinion poll live streaming when and where to watch live coverage online and tv channel)

ओपिनियन पोल कुठं पाहणार?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडुणकीचा सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 बांग्ला, टीव्ही 9 भारतवर्ष आणि टिव्ही 9 नेटवर्कच्या टीव्ही 9 मराठी, टीव्ही 9 गुजराती, टीव्ही 9 कन्नडा आणि टीव्ही 9 तेलुगु या वाहिन्यांवर पाहायला मिळणार आहे. टीव्ही 9 नेटवर्कनं पोलस्ट्रॅट या संस्थेच्या सहकार्यानं ओपिनियन पोलचा सर्व्हे केला आहे.

पश्चिम बंगालची राजकीय स्थिती काय?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44, डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार आहे.

पहिला टप्पा – 27 मार्च, 30 जागा
दुसरा टप्पा – 1 एप्रिल, 20 जागा
तीसरा टप्पा – 6 एप्रिल, 31 जागा
चौथा टप्पा – 10 एप्रिल, 44 जागा
पाचवा टप्पा – 17 एप्रिल, 45 जागा
सहावा टप्पा – 22 एप्रिल, 43 जागा
सातवा टप्पा – 26 एप्रिल, 36 जागा
आठवा टप्पा – 29 एप्रिल, 25 जागा
मतमोजणी आणि निकाल – 2 मे रोजी

राजकीय गणित काय?

पश्चिम बंगालमध्ये 294 सदस्यांची विधानसभा आहे. 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल 219 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलं होतं. या विजयासाठी ममता बॅनर्जींनी सलग दुसऱ्यांदा बंगालमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेसला केवळ 23, डाव्यांना 19 आणि भाजपला 16 जागाच मिळाल्या होत्या. आता भाजप आपल्या 16 जागांवरुन किती जागांवर विजय मिळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (whole scenario of west bengal politics for 2021 assembly election)

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

तृणमूल काँग्रेस -219
काँग्रेस -23
डावे – 19
भाजप – 16
एकूण – 294

टीव्ही 9 भारतवर्षवर पश्चिम बंगालचा ओपिनियन पोल पाहण्यासाठी इथं क्लिक करा


संबंधित बातम्या :

West Bengal Election 2021 Opinion Poll LIVE : दीदींची जादू, की भाजप ठरणार दादा? प. बंगाल विधानसभा निवडणुकांचे ओपिनियन पोल

West Bengal Election 2021 : TMC म्हणजे ‘ट्रान्सफर माय कमिशन’, पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

West Bengal assembly election 2021 opinion poll live streaming when and where to watch live coverage online and tv channel TV9 Bangla Polstrat TV9 Bharatvarsh Polstrat TV9 Network Polstrat