West Bengal Election 2021 Opinion Poll LIVE : बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता सरकार, ओपिनियन पोलचा अंदाज

ओपिनियन पोलमध्ये पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजप, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस यांच्यात कौन कितने पानी मे है, हे पाहणं महत्त्वाचं आहे (west bengal election 2021 opinion poll)

West Bengal Election 2021 Opinion Poll LIVE : बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता सरकार, ओपिनियन पोलचा अंदाज
पश्चिम बंगाल ओपिनियन पोल

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 19, 2021 | 6:45 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Election 2021) तारखा जाहीर झाल्यापासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेसमधील अनेक बडे नेते पक्षाला रामराम ठोकत भाजपच्या गोटात सामील होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ममतादीदींची जादूही कायम असल्याचं चित्र आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (Mamata Banerjee) यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांना मतदारांची सहानुभूती मिळताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, 3 आमदार असलेला भाजप प्रमुख विरोधी पक्ष होऊ शकतो. टीएमसीला 43.1 टक्के, भाजपला 38.8 टक्के, काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या आघाडीला 11.7 टक्के मतं मिळू शकतात तर इतरांना 6.4 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.  (west bengal election 2021 opinion poll)

मुख्यमंत्री पदाची पसंती कुणाला?

ओपिनियन पोलनुसार मुख्यमंत्री पदाची पहिली पसंती ममता बॅनर्जी (51.8) यांना आहे. अर्ध्यापेक्षा जास्त मतदारांचा कौल ममता बॅनर्जींना असल्याचं दिसतं. तर भाजपचे दिलीप घोष (24.2), मिथुन चक्रवर्ती (4.6) आणि शुभेंदू अधिकारी (5.2) यांना ममता बॅनर्जी यांच्या तुलनेत कमी पसंती आहे.

निवडणुकीत कुणाचा फॅक्टर?

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचाच फॅक्टर चालणार असल्याचं पोलमध्ये स्पष्ट झालंय. ममता बॅनर्जी यांचा फॅक्टर चालेल, असं 39.7 टक्के, नरेंद्र मोदी फॅक्टर चालेल असं 28.6 , मुस्लीम फॅक्टर 6.3 , भ्रष्टाचाराचा मुद्दा 14.4 टक्के आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा चालेल, असं 6.2 टक्के लोकांना वाटतं.

ममता बॅनर्जींना दुखापतीचा फायदा?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांच्या पायाला दुखापत झाली त्याचा फायदा होत असल्याचं 47 टक्के लोकांना वाटत. तर, त्यांना फायदा होणार नाही असं 41.7 टक्के लोकांना वाटते तर 11.3 टक्के लोकांनी त्यांचं उत्तर दिलं नाही.

बंगालचा विकास कोण करणार?

ओपनियन पोलमध्ये पश्चिम बंगालचा विकास तृणमूल काँग्रेस करेल असा विश्वास 51.1 टक्के लोकांना वाटतं. तर, 38.6 लोकांनी भाजपला पसंती दिली आहे. तर डाव्या पक्षांना 7.5, काँग्रेस 1.1 टक्के, इतर 1.7 टक्के असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

नंदीग्राममध्ये काय होणार?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतादारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तिथे त्यांच्यासमोर एकेकाळचे सहकारी शुभेंदू अधिकारी यांचं आव्हान आहे. नंदीग्राममध्ये 50 टक्के लोकांची पसंती ममता बॅनर्जी यांना असून 40.7 टक्के शुभेंदू अधिकारी आणि मिनाक्षी मुखर्जी यांना 9.3 टक्के लोकांची पसंती आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 19 Mar 2021 06:16 PM (IST)

  बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता सरकार, ओपिनियन पोलचा अंदाज

  पश्चिम बंगालमध्ये ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, 3 आमदार असलेला भाजप प्रमुख विरोधी पक्ष होऊ शकतो. टीएमसीला 43.1 टक्के, भाजपला 38.8 टक्के, काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या आघाडीला 11.7 टक्के मतं मिळू शकतात तर इतरांना 6.4 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.

 • 19 Mar 2021 06:05 PM (IST)

  नंदीग्राममध्ये मतदारांची पसंती ममता बॅनर्जींना,शुभेंदू अधिकारी यांच्या अडचणी वाढल्या

  ओपिनियन पोलनुसार नंदीग्राममध्ये मतदारांची पसंती ममता बॅनर्जींना असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांच्या अडचणी वाढल्याचं पोलमधून दिसतं.

 • 19 Mar 2021 05:49 PM (IST)

  ओपिनियन पोलमध्ये बंगालच्या जनतेची ममता बॅनर्जींना पसंती

  ओपिनियन पोलमध्ये बंगालच्या जनतेची ममता बॅनर्जींना पसंती असल्याचं दिसून येते. बंगालचा विकास कोण करेल? या प्रश्नावर ओपनियन पोलमध्ये 57 टक्के लोकांनी ममता बॅनर्जींना पसंती दिली आहे.

 • 19 Mar 2021 05:18 PM (IST)

  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची सर्वाधिक पसंती ममता बॅनर्जींना

  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची सर्वाधिक पसंती ममता बॅनर्जींना असल्याचं ओपिनियन पोलमधून दिसून आलं आहे. भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांना बंगालच्या मतदारांची पसंती नसल्याचं ओपिनियन पोलमध्ये स्पष्ट झालं आहे.

 • 19 Mar 2021 05:13 PM (IST)

  पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी फॅक्टरमध्ये लढाई

  पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॅक्टरमध्ये लढाई होणार असल्याचं ओपिनियन पोलवरुन दिसून येतं.  ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये सत्ता कायम राखतात का याचा अंदाज ओपिनियन पोलमधून समजणार आहेत.

 • 19 Mar 2021 04:03 PM (IST)

  बंगालमध्ये कोणाची सत्ता?

  विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्यापासून पश्चिम बंगालच्या राजकारणाकडे सर्वांचे लक्ष आहे. बंगालची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने चांगलीच तयारी केली आहे. मात्र, बंगालमधील जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनाच पसंती दिल्याचे ओपिनयन पोलमधून समोर येत आहे. एबीपी-सीव्होटरच्या ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेसला 148-164 जागा मिळू शकतात. तर भाजपला येथे 92 ते 108 जागांवरच समाधान मानावे लागू शकते. पश्चिम बंगालमध्ये काँग्रस आणि डाव्या आघाडीला 31-39 जागा मिळू शकतात.

 • 19 Mar 2021 04:03 PM (IST)

  पश्चिम बंगालची राजकीय स्थिती काय?

  पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून 2 मे रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44, डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

 • 19 Mar 2021 04:02 PM (IST)

  पश्चिम बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

  तृणमूल काँग्रेस -219 काँग्रेस -23 डावे – 19 भाजप – 16 एकूण – 294

Published On - Mar 19,2021 6:16 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें