Eknath Shinde: त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय, 12 बंडखोर आमदारांना आलेल्या नोटीशीवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jun 24, 2022 | 6:02 PM

Eknath Shinde: आम्हालाही कायदा कळतो. काय करायचं ते आम्हालाही माहीत आहे. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. विधानसभेच्या कामकाजाबाबतच व्हीप लागू होतो. पक्षाच्या मिटिंगसाठी व्हीप लागू होत नाही.

Eknath Shinde: त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय, 12 बंडखोर आमदारांना आलेल्या नोटीशीवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू झाली आहे. तसेच शिवसेना (shivsena) पक्ष वाचवण्यासाठीही शिवसेनेची धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांची आमदारकी घालवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे गटाच्या 12 आमदारांना निलंबित करण्याची शिफारस शिवसेनेने विधानसभेच्या (vidhansabha) उपसभापतींकडे केली आहे. तसेच आणखी पाच आमदारांना निलंबित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेच्या या हालचालीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुणाला घाबरवता? आम्ही घाबरणारे नाहीत, असं सांगतानाच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणूनच ते ती कारवाई करायला निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्हालाही कायदा कळतो. काय करायचं ते आम्हालाही माहीत आहे. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. विधानसभेच्या कामकाजाबाबतच व्हीप लागू होतो. पक्षाच्या मिटिंगसाठी व्हीप लागू होत नाही. त्यामुळे आमचे आमदार निलंबित केलेच जाऊ शकत नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते अशाप्रकारच्या हालाचील करत आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

आमच्याकडे मॅजिक फिगर

जे कारवाीचं पत्रं दिलं आहे. ते बेकायदेशीर आहे. आमदारांना निलंबित करण्याचा अधिकार त्यांना नाही. आमच्याकडे मॅजिक फिगर आहे. ते आम्हाला घाबरवण्यासाठी असं बोलत आहेत. जी 37 आमदारांची संख्या लागते ती आमच्याकडे आहे. ज्यांच्याकडे ही संख्या असते त्यांचा विजय होत असतो. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे त्याबाबतचे निकाल आहेत, असंही ते म्हणाले.

राज्यपालांशी संपर्क नाही

पुढील रणनीती ठरवण्यासाठी आमची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढे काय करायचं ते ठरवू, असं सांगतानाच राज्यपालांशी आमचा काही संपर्क झाला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

जाधव यांच्याशी काहीही संपर्क नाही

भास्कर जाधव हे तुमच्या संपर्कात आहेत का? असा सवाल केला असता त्यांनी नाही असं उत्तर दिलं. भास्कर जाधव यांच्याविषयी मला माहिती नाही. माझं त्यांच्याशी काहीही बोलणं झालं नाही, असं त्यांनी सांगितलं.