AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप उमेदवारांविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार कोण?

मुंबई : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा होती. त्यानंतर भाजपने महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली. तिसऱ्या यादीत 6 जणांची नावं आहेत. नागपुरातून नितीन गडकरी, नगरमधून सुजय विखे पाटील अशा महत्त्वाचे उमेदवार भाजपच्या पहिल्या यादीत होते. तर दुसऱ्या यादीत पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांंचन कूल […]

भाजप उमेदवारांविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार कोण?
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM
Share

मुंबई : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा होती. त्यानंतर भाजपने महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली. तिसऱ्या यादीत 6 जणांची नावं आहेत. नागपुरातून नितीन गडकरी, नगरमधून सुजय विखे पाटील अशा महत्त्वाचे उमेदवार भाजपच्या पहिल्या यादीत होते. तर दुसऱ्या यादीत पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांंचन कूल यांची नावं आहेत. भाजपच्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या प्रत्येकी दोन याद्या जाहीर केल्या. काँग्रेसने आज तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे कुठल्या उमेदवारासमोर कोण उमेदवार असेल, याचं चित्र थोडंफार स्पष्ट झालं आहे.

कुठल्या उमेदवाराला कुणाची टक्कर?

  1. नागपूर – नितीन गडकरी (भाजप) विरुद्ध नाना पटोले (काँग्रेस)
  2. नंदुरबार – हिना गावित (भाजप) विरुद्ध के. सी. पडवी (काँग्रेस)
  3. धुळे – सुभाष भामरे (भाजप) विरुद्ध कुणाल पाटील (काँग्रेस)
  4. उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन (भाजप) विरुद्ध प्रिया दत्त (काँग्रेस)
  5. नगर – सुजय विखे (भाजप) विरुद्ध संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)
  6. बीड – डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) विरुद्ध बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
  7. वर्धा – रामदास तडस (भाजप) विरुद्ध चारुलता टोकस (काँग्रेस)
  8. चिमूर-गडचिरोली – अशोक नेते (भाजप) विरुद्ध नामदेव उसेंडी (काँग्रेस)
  9. रावेर – रक्षा खडसे (भाजप) विरुद्ध 
  10. अकोला – संजय धोत्रे (भाजप) विरुद्ध 
  11. जालना – रावसाहेब दानवे (भाजप) विरुद्ध  विलास औताडे (काँग्रेस)
  12. भिवंडी – कपिल पाटील (भाजप) विरुद्ध  सुरेश टावरे (काँग्रेस)
  13. उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी
  14. लातूर – सुधाकरराव श्रंगारे (भाजप) विरुद्ध मच्छिलिंद्र कामत (काँग्रेस) 
  15. सांगली – संजयकाका पाटील (भाजप) विरुद्ध  
  16. चंद्रपूर – हंसराज अहीर (भाजप) विरुद्ध  विनायक बांगडे (काँग्रेस)  
  17. पुणे – गिरीष बापट (भाजप) विरुद्ध  
  18. बारामती – कांचन कुल (भाजप) विरुद्ध सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
  19. सोलापूर – जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप) विरुद्ध  सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
  20. जळगाव- स्मिता वाघ (भाजप) विरुद्ध गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
  21. नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) विरुद्ध  
  22. दिंडोरी – डॉ भारती पवार (भाजप) विरुद्ध धनराज महाले (राष्ट्रवादी)

वाचा : Loksabha Election 2019 : भाजपची पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुकांसाठी आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. सर्वच पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत.  भाजपने महाराष्ट्रातील दुसरी तर काँग्रेसने तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.

संबंधित बातम्या : 

काँग्रेसची उमेदवार यादी, औरंगाबादमध्ये सुभाष झांबड, चंद्रपुरात मुत्तेमवारांना धक्का   

बारामतीत सुप्रिया सुळेंना टक्कर देणाऱ्या कांचन कुल कोण आहेत ?   

भाजपची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं घोषित 

भाजपच्या पहिल्या यादीत दोन विद्यमान खासदारांना डच्चू

भाजपच्या पहिल्या यादीमुळे महाराष्ट्रातील दोन रोमहर्षक लढती निश्चित

पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून ‘या’ बड्या नेत्याला संधी

Follow Us
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?