AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून ‘या’ बड्या नेत्याला संधी

मुंबई : भाजपने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीतून भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाच डच्चू दिला आहे. अडवाणी यांचं नुसतं नाव यादीतून वगळलं नाही, तर अडवाणी ज्या मतदारसंघातून लढतात, त्या गांधीनगरमधून भाजपाध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लालकृष्ण अडवाणी यांचे वय 91 वर्ष झाल्याने त्यांना तिकीट न दिल्याची चर्चा […]

पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून 'या' बड्या नेत्याला संधी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM
Share

मुंबई : भाजपने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीतून भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाच डच्चू दिला आहे. अडवाणी यांचं नुसतं नाव यादीतून वगळलं नाही, तर अडवाणी ज्या मतदारसंघातून लढतात, त्या गांधीनगरमधून भाजपाध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लालकृष्ण अडवाणी यांचे वय 91 वर्ष झाल्याने त्यांना तिकीट न दिल्याची चर्चा भाजपमध्ये सुरु आहे. देशाचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान राहिलेले लालकृष्ण अडवाणी सलग 6 वेळा गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत. 1980 च्या दशकात तसेच 1990 च्या दशकात भाजपला देशभरात वाढवण्याचे श्रेय लालकृष्ण अडवाणी यांना दिले जाते.

1984 मध्ये भाजपला दोन जागांवरुन 180 जागांपर्यंत पोहोचवणारे लालकृष्ण अडवाणी आता भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्येही नाहीत. 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांचे पक्षातील अनेकांसोबत वाद झाले होते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नेत्यांचे तिकीट कापल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातही भापजने विद्यमान खासदार दिलीप गांधी आणि सुनिल गायकवाड या दोघांचे तिकीट कापले आहे. यामुळे पक्षांतर्गत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र

नागपूर – नितीन गडकरी नंदुरबार – हिना गावित धुळे – सुभाष भामरे रावेर – रक्षा खडसे अकोला – संजय धोत्रे वर्धा – रामदास तडस चिमूर-गडचिरोली – अशोक नेते जालना – रावसाहेब दानवे भिवंडी – कपिल पाटील उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन नगर – सुजय विखे बीड – डॉ. प्रीतम मुंडे लातूर – सुधाकरराव श्रंगारे सांगली – संजयकाका पाटील चंद्रपूर – हंसराज अहीर

महत्त्वाची नावं :

वाराणसी – नरेंद्र मोदी गांधीनगर – अमित शाह लखनौ – राजनाथ बागपत – सत्यपाल सिंग गाझियाबाद – व्ही के सिंग मथुरा – हेमा मालिनी उन्नाव – साक्षी महाराज अमेठी – स्मृती इराणी जयपुर ग्रामीण – राज्यवर्धन सिंह राठोड

निवडणुकीच्या तारखा जाहीर :

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Follow Us
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका