High Court | नवाब मलिक, अनिल देशमुखांच्या याचिकेवर उद्या कोर्टात संयुक्त सुनावणी, विधान परिषदेत मतदानासाठी जामीन मिळणार काय?

| Updated on: Jun 14, 2022 | 1:22 PM

या दोन्ही याचिकांवर आता उद्या एकत्रित सुनावणी होणार आहे. त्यामुळं विधान परिषदेत मलिक आणि देशमुख यांना मतदान करता येणार की नाही हे उद्या न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. ही दोन्ही मतं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शिवाय अपक्षांच्या मतांवरही बरेच गणित अवलंबून राहणार आहे.

High Court | नवाब मलिक, अनिल देशमुखांच्या याचिकेवर उद्या कोर्टात संयुक्त सुनावणी, विधान परिषदेत मतदानासाठी जामीन मिळणार काय?
नवाब मलिक आणि अनिल देशमुख
Image Credit source: t v 9
Follow us on

मुंबई : नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या याचिकेवर उद्या 15 जून रोजी हायकोर्टात (High Court) एकत्रित सुनावणी होणार आहे. आगामी विधान परिषदेच्या मतदानाकरिता परवानगीसाठी देशमुख आणि मलिकांची हायकोर्टात याचिका दाखल केली होती. एकत्रित सुनावणीकरिता मलिकांच्यावतीनं केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. मलिक आणि देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Cell) आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी नवाब मलिक यांनी गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, मलिक यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला होता. आता 20 जून रोजी विधान परिषदेच्या (Legislative Council) निवडणुका आहेत. या निवडणुकीत मतदान करता यावं, यासाठी जेलमध्ये असलेले हे दोन्ही नेते धडपड करत आहेत.

नव्याने केलेल्या याचिकेवर सुनावणी

दहशतवादी दाऊद इब्राहीमसोबतच्या आर्थिक व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक कैदेत आहेत. 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदार करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मलिकांनी हायकोर्टात नवी याचिका दाखल केली. राज्यसभेत त्यांना मतदान करता आलं नव्हतं. आता विधान परिषदेत तरी मतदान करता यावं, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. काल संध्याकाळी विधान परिषद निवडणुकीतील मतदानासाठी नव्यानं याचिका दाखल करण्यात आली. त्यावर आज न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

उद्याच्या निकालावर मतदान अवलंबून

मनी लाँड्रींग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा जेलमध्ये आहेत. त्यांनीही मुंबई उच्च न्यायालयात विधान परिषदेसाठी मतदान करण्याची मुभा मिळावी, यासाठी अर्ज केला. त्यावर 15 जून रोजी न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्यासमोर सुनावणी पार पडणार आहे. 20 जूनच्या मतदानासाठी तात्पुरता जामीन देण्यात यावा, अशी विनंती हायकोर्टाकडे केली आहे. या दोन्ही याचिकांवर आता उद्या एकत्रित सुनावणी होणार आहे. त्यामुळं विधान परिषदेत मलिक आणि देशमुख यांना मतदान करता येणार की नाही हे उद्या न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. ही दोन्ही मतं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शिवाय अपक्षांच्या मतांवरही बरेच गणित अवलंबून राहणार आहे.

हे सुद्धा वाचा