‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’, आदित्य ठाकरेंसाठी युवासेनेची मोहीम

| Updated on: Oct 28, 2019 | 5:38 PM

युवासेनेने वरळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या आदित्य ठाकरेंसाठी 'माझा आमदार, माझा मुख्यमंत्री' ही मोहीम सुरु केली (Aditya Thackeray Candidate for CM). त्यामुळे भाजपमधील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्यांची चिंता आता वाढली आहे.

माझा आमदार, माझा मुख्यमंत्री, आदित्य ठाकरेंसाठी युवासेनेची मोहीम
Follow us on

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं भाजपवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे (BJP and Shivsena). एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यात यावं आणि त्यासाठी भाजपने लिखित आश्वासन द्यावं अशी मागणी केली आहे (Shivsena Want CM Post). तर दुसरीकडे, युवासेनेने वरळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या आदित्य ठाकरेंसाठी ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’ ही मोहीम सुरु केली (Aditya Thackeray Candidate for CM). त्यामुळे भाजपमधील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्यांची चिंता आता वाढली आहे.

युवासेना समर्थकांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट सध्या चर्चेत आहेत (Aditya Thackeray Candidate for CM). युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांचं अभिनंदन करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यासोबतच त्यांनी ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’ ही टॅगलाईनही दिली (Aditya Thackeray Candidate for CM). सुरुवातीला फक्त एक-दोन पदाधिकऱ्यांनी अशा पोस्ट शेअर केल्या, मात्र आता त्याचं मोहिमेत रुपांतर झालं आहे. सध्या प्रत्येक पदाधिकारी-कार्यकर्ता सोशल मीडियावर याचा प्रसार करत आहेत.

आदित्य ठाकरेंनी राज्याचं नेतृत्व करावं ही भूमिका पहिल्यांदा युवा सेनेतून जाहीररित्या व्यक्त करण्यात आली होती. संघटनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी गेल्या जून महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्य पिंजून काढलं आणि आता ते वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून येत विधानसभेतही पोहोचले.

आदित्य ठाकरेंच्या विधानसभा प्रवेशाने आपसूकच भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार आणि युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीची भूमिका लावून धरण्याची राजकीय खेळी करण्यात आली आहे. तर भाजपही ऐनवेळी शिवसेनेचा 50-50 चा फार्म्युला मान्य करताना उद्धव ठाकरे यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळावं, अशी मागणी करू शकते.

शिवसेनेत सध्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे या एकाच नावाचा जयघोष सुरु आहे. या गोंगाटात मित्रपक्ष भाजप आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा आवाज दबला जात असल्याचं चित्र आहे.

‘यंग सोच विन्स’ हे वाक्य अत्यंत बोलकं आहे. आदित्य ठाकरेंना सक्रिय राजकारणातून संसदीय राजकारणात आणत युवा सेनेने अर्धी लढाई जिंकली आहे. आता मुख्यमंत्री पदाची मागणी लावून धरत पूर्ण लढाई जिंकण्याचा युवा सेनेचा मनसुबा दिसतो आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.