भीमा कोरेगाव : क्रांती दिन जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीत होणार

पुणे : क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावला प्रशासनाने कडक उपाययोजना राबवल्या आहेत. क्रांती दिन जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणात पार पडणार आहे. परवानगीशिवाय फलक, स्टेज, स्टॉल्स लावण्यास मनाई करण्यात आलीय. गेल्या वर्षी क्रांती दिनानंतर दोन गटांमध्ये वाद होऊन हिंसाचार झाला होता. त्यानंतर यावर्षी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर कडक कारवाईचा […]

भीमा कोरेगाव : क्रांती दिन जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीत होणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 3:14 PM

पुणे : क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावला प्रशासनाने कडक उपाययोजना राबवल्या आहेत. क्रांती दिन जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणात पार पडणार आहे. परवानगीशिवाय फलक, स्टेज, स्टॉल्स लावण्यास मनाई करण्यात आलीय. गेल्या वर्षी क्रांती दिनानंतर दोन गटांमध्ये वाद होऊन हिंसाचार झाला होता. त्यानंतर यावर्षी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर कडक कारवाईचा ईशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलाय. तर कार्यक्रमाचे आयोजक हे स्थानिक नागरिक आणि जिल्हा प्रशासन असेल. कार्यक्रमाच्या अगोदर जातीय तणाव निर्माण करणार्‍यांना सभांना परवानगी देणार नसल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलंय. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी परवानगीशिवाय फलक, स्टेज, स्टॉल्स लावण्यास मनाई करण्यात आलीय. समाजकंटकांवर पोलिसांची कडक नजर असेल. संभ्रम आणि अफवा पसरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. स्थानिकांना पूर्वीपासून आयोजनाची माहिती आहे. त्यांना गरज भासल्यास प्रशासन सहकार्य करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय. क्रांती दिन प्रशासनाच्या देखरेखीखाली होणार असून स्थानिकांना आयोजनासाठी सर्व सहकार्य केलं जाणार आहे. कार्यक्रमाला मदत करु शकता, मात्र नकारात्मक मेसेज पसरवणाऱ्यांना रोखलं जाणार आहे. कुणावरही प्रतिबंध घातलेला नाही, पण प्रत्येकावर प्रशासनाची करडी नजर असेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.