बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला 16 तासांनी बाहेर काढलं!

पुणे : बोअरवेलमध्ये अडकलेल्या 6 वर्षीय मुलाला 16 तासांनी बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांना यश आले आहे. रवी पंडीत हा काल संध्याकाळी खेळता खेळता 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. काल संध्याकाळपासून गावकरी आणि  NDRF चे पथक त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अखेर 16 तासांनी त्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. रवी पंडीत मिल …

बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला 16 तासांनी बाहेर काढलं!

पुणे : बोअरवेलमध्ये अडकलेल्या 6 वर्षीय मुलाला 16 तासांनी बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांना यश आले आहे. रवी पंडीत हा काल संध्याकाळी खेळता खेळता 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. काल संध्याकाळपासून गावकरी आणि  NDRF चे पथक त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अखेर 16 तासांनी त्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

रवी पंडीत मिल असं या 6 वर्षाच्या मुलाचे नाव आहे. रवी मूळचा शेगाव पाथर्डीचा रहिवाशी असून त्याचे आई-वडील रस्त्यावर दगड फोडण्याचे बिगारी काम करतात.

सहा वर्षीय रवी पंडीत 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडल्याची घटना काल पुण्यातील आंबेगावात घडली होती. बुधवारी संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मुलाला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. गेल्या 16 तासापासून रवी मृत्यूशी झुंज देत होता.

ही बोअरवेल 200 फूट खोल असून हा मुलगा 10 ते 15 फूट खोलीवर अडकला होता. रवीचे आई-वडील थोरांदळे जाधववाडी येथे रस्त्याचे काम करत असताना रवी त्या ठिकाणी खेळत होता आणि याच ठिकाणी खेळता खेळता तो बोअरवेलमध्ये पडला.

घटनास्थळी एनडीआरएफचे पथक, स्थानिक नागरिक आणि मंचर पोलिसांच्या मदतीने रवीला बाहेर काढण्यासाठी कालपासून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अखेर त्याला बाहेर काढण्यात एनडीआरएफ पथकाला यश आले आहे.

व्हिडीओ : बोअरवेलमध्ये ६ वर्षांचा मुलगा पडला, NDRF चे शर्थीचे प्रयत्न सुरु

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *