AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे लोकसभा: भाजपकडून जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ चर्चेत

पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप धक्कातंत्र अवलंबण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीसाठी वडगावशेरीचे  भाजप आमदार जगदीश मुळीक आणि स्थायी समिती माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक मुरलीधर मोहळ यांचं नाव आघाडीवर आहे.  भाजप अंतर्गत सर्व्हेनंतर ही नावं पुढं आल्याची माहिती  सूत्रांनी दिली. लोकसभेसाठी आतापर्यंत विद्यमान भाजप खासदार अनिल शिरोळे आणि राज्याचे मंत्री गिरीश बापट यांच्या नावाची चर्चा […]

पुणे लोकसभा: भाजपकडून जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ चर्चेत
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप धक्कातंत्र अवलंबण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीसाठी वडगावशेरीचे  भाजप आमदार जगदीश मुळीक आणि स्थायी समिती माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक मुरलीधर मोहळ यांचं नाव आघाडीवर आहे.  भाजप अंतर्गत सर्व्हेनंतर ही नावं पुढं आल्याची माहिती  सूत्रांनी दिली.

लोकसभेसाठी आतापर्यंत विद्यमान भाजप खासदार अनिल शिरोळे आणि राज्याचे मंत्री गिरीश बापट यांच्या नावाची चर्चा होती. त्याचबरोबर शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचंही नाव पुढे आले होतं. मात्र आता जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहळ यांच्या नावाच्या चर्चाने भाजपचा पुण्यातील गुंता वाढताना दिसत आहे.

कोण आहेत जगदीश मुळीक?

जगदीश मुळीक हे सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत.

मुळीक 2014 मध्ये वडगावशेरी मतदारसंघात विजयी झाले.

2014 चा निकाल

सध्या पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अनिल शिरोळे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा पराभव केला होता. सध्या विश्वजीत कदम हे वडील पतंगराव कदम यांच्या जागी विधानसभा पोटनिवडणुकीत सांगलीतून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी यावेळी काँग्रेसकडून भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पुण्यात नेमकं तिकीट कुणाला मिळतं आणि कुणाविरोधात कोण लढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विधानसभा निवडणूक 2014

पुणे जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 21 मतदार संघ आहेत. त्यापैकी भाजपचे 11, शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 3, काँग्रेसचा 1, मनसेचा 1, रसपचा 1 आणि अपक्ष 1 असे आमदार निवडून आले होते. पुढे अपक्ष भाजपाला जाऊन मिळाला.

संबंधित बातम्या 

लोकसभा निवडणूक : पुणे जिल्ह्याचं राजकारण निर्णायक ठरणार!   

पुणे लोकसभा : आघाडीची तयारी, भाजप पिछाडीवर असल्याचं चित्र  

संजय काकडे काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवणार?

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल