AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणूक : पुणे जिल्ह्याचं राजकारण निर्णायक ठरणार!

पुणे : लोकसभा निवडणुकीची धूम सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. कोण कुठून लढणार, कुणाला उमेदवारी मिळणार याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. महाराष्ट्रतील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी पुणे जिल्हा नेहमीच निर्णायक असतो. कारण पुणे जिल्ह्यात साडे तीन लोकसभा मतदारसंघ आणि 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ या चारपैकी मावळमधील विधानसभेचे तीन मतदारसंघ पुणे […]

लोकसभा निवडणूक : पुणे जिल्ह्याचं राजकारण निर्णायक ठरणार!
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM
Share

पुणे : लोकसभा निवडणुकीची धूम सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. कोण कुठून लढणार, कुणाला उमेदवारी मिळणार याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. महाराष्ट्रतील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी पुणे जिल्हा नेहमीच निर्णायक असतो. कारण पुणे जिल्ह्यात साडे तीन लोकसभा मतदारसंघ आणि 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ या चारपैकी मावळमधील विधानसभेचे तीन मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील आहेत.

लोकसभा 2014 मध्ये पुण्यातून भाजपचे अनिल शिरोळे, शिरूरमधून शिवसेनेचे शिवाजीराव आढाळराव पाटील, मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि बारामतीतून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या. त्यांनी अनुक्रमे – काँग्रेसचे विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे देवदत्त निकम, शेकापचे लक्ष्मण जगताप आणि भाजपचे बाळासाहेब गावडे यांचा पराभव केला होता.

पुण्यातील विधानसभेच्या सर्व सहाही मतदारसंघात भाजपाला मताधिक्य मिळालं होतं. शिरूरमधील विधानसभेच्या सर्व सहाही मतदारसंघात शिवसेनेला मताधिक्य मिळालं होतं. मावळमधील पुणे जिल्ह्यात येणाऱ्या तीन मतदारसंघात शिवसेनेला मताधिक्य मिळालं होतं. बारामतीतील विधानसभेच्या सहापैकी तीन मतदारसंघात राष्ट्रवादीला, तर तीन मतदारसंघात रासप-भाजपला मताधिक्य मिळालं होतं.

विधानसभा निवडणूक 2014

पुणे जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 21 मतदार संघ आहेत. त्यापैकी भाजपचे 11, शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 3, काँग्रेसचा 1, मनसेचा 1, रसपचा 1 आणि अपक्ष 1 असे आमदार निवडून आले होते. पुढे अपक्ष भाजपाला जाऊन मिळाला.

विधानसभा मतदारसंघनिहाय निकाल

पुणे लोकसभांतर्गत विधानसभा

शिवाजी नगर – भाजप विजयी कोथरूड – भाजप विजयी पर्वती – भाजप विजयी कसबा – भाजप विजयी कँटोन्मेंट – भाजप विजयी वडगाव शेरी – भाजप विजयी

शिरूर लोकसभांतर्गत विधानसभा

आंबेगाव – राष्ट्रवादी विजयी खेड- आळंदी – शिवसेना विजयी जुन्नर – मनसे विजयी शिरूर – भाजप विजयी भोसरी – अपक्ष विजयी हडपसर – भाजप विजयी

मावळ लोकसभांतर्गत विधानसभा

पिंपरी – शिवसेना विजयी चिंचवड – भाजप विजयी वाडगाव मावळ – भाजप विजयी (या मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यात आहेत. कर्जत, उरण आणि पनवेल.)

बारामती लोकसभांतर्गत विधानसभा

बारामती – राष्ट्रवादी विजयी इंदापूर – राष्ट्रवादी विजयी दौंड – रासप विजयी भोर -वेल्हा – मुळशी – काँग्रेस विजयी पुरंदर – सेना विजयी खडकवासला – भाजप विजयी

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढले होते. मावळ वगळता निकालही अपेक्षेप्रमाणे लागले होते. या निवडणुकांमध्ये मोदी लाट हा घटक महत्वाचा ठरला. यावेळी बारामती वगळता इतर ठिकाणी युती होणे, न होणे तसेच उमेदवार कोण यावर बरेच काही अवलंबून आहे. मावळ बद्दल संदिग्धता आहे. तुल्यबळ उमेदवार नसल्याने शिवसेनेसाठी शिरूर शाबूत राहू शकेल. पुण्यात विरोधकांकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने भाजप पकड कायम ठेवण्याची शक्यता आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. यावेळी पुणे शहरातील कोथरूड वगळता शिवसेनेच्या परिस्थितीत फार काही सुधारणा झाली नाही. कांग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी सर्वच ठिकाणी मोठं आव्हान उभं करणार आहे. त्यामुळे भाजपलाही 2019 ची निवडणूक अवघड जाणार आहे. तर यात शिवसेनेचा तिसरा किंवा चौथा क्रमांक असणार आहे.

शिरूरमधील खेड, हडपसर आणि जुन्नरमध्ये शिवसेनेची ताकद आहे. पण ती उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी नाही. भाजपसाठी भोसरी आणि काही प्रमाणात शिरूर साथ देईल. त्यामुळे सहापैकी बहुतेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व बघायला मिळू शकते. बारामतीतील खडकवासला वगळता भाजपने इतर कुठे अपेक्षा ठेवू नये. पुरंदर राखणं शिवसेनेला अवघड होणार आहे. सहापैकी बहुतेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व बघायला मिळू शकते. मावळ विधानसभेचे तीनही मतदारसंघ भाजपला साथ देऊ शकतात. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीचं आव्हान भाजपला असणार आहे. येथे शिवसेनेला फारसा वाव नाही. त्यामुळे आहे ती जागा कायम राहू शकते.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे नेत्यांची मजबूत फळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, वंदना चव्हाण, चेतन तुपे इत्यादी, तर काँग्रेसकडे ग्रामीण भागात हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे तर शहरात रमेश बागवे, मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे असे मर्यादित प्रभाव असलेले नेते आहेत. तर भाजपकडे गिरीश बापट, संजय काकडे (पक्षात राहिल्यास), अनिल शिरोळे, प्रकाश जावडेकर, अमर साबळे, संजय (बाळा) भेगडे, मेधा कुलकर्णी, योगेश गोगावले आदी नेते आहेत. शिवसेनेकडे नीलम गोऱ्हे, चंद्रकांत मोकाटे, विजय शिवतारे असे मर्यादित प्रभाव असेलेले नेते आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.