जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरण, राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांना जामीन

दीपक मानकर यांच्याकडे अनेक वर्षे काम करणार्‍या जितेंद्र जगताप यांनी 2 जून 2018 रोजी घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती.

NCP Corporator Deepak Mankar bail, जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरण, राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांना जामीन

पुणे : जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले पुण्याचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर (NCP Corporator Deepak Mankar bail) आणि सुधीर सुतार यांची उच्च न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे. परंतु, मोक्कातून वगळण्याबाबत त्यांना तूर्तास दिलासा मिळालेला नाही.

मोक्का रद्द करण्याबाबत दीपक मानकर यांनी याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे, ए. जे. जमादार यांनी हा आदेश दिला.

दीपक मानकर यांच्याकडे अनेक वर्षे काम करणार्‍या जितेंद्र जगताप यांनी 2 जून 2018 रोजी घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती.

जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मानकरसह विनोद रमेश भोळे, सुधीर दत्तात्रेय सुतार अमित उत्तम तनपुरे, शांताराम पवार, विशांत श्रीरंग कांबळे, कुख्यात गुंड नाना कुदळे आणि अजय कंधारे यांना अटक झाली होती. तर बिल्डर सुधीर कर्नाटकी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात दोषारोपपत्रही दाखल आहे.

होमगार्डला शिवीगाळ, अभिजीत बिचुकलेंविरोधात गुन्हा

या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर दीपक मानकर यांच्यावर ‘मोक्का’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गेली एक वर्षे मानकर तुरुंगात होते. हायकोर्टाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर दोघांची एक लाख रुपयांच्या जामिनावर सुटका (NCP Corporator Deepak Mankar bail) करण्याचा आदेश दिला.

दरम्यानच्या काळात मानकर यांच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मानकरांवर मोक्कानुसार कारवाई करण्याची परवानगी देताना त्यांच्यावर 14 ऐवजी आठच गुन्हे असल्याबाबतचा अहवाल दिल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि सध्याचे मुंबई रेल्वे आयुक्त रवींद्र सेनगावकर यांची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच विशेष मोक्का न्यायालयाने दिले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *