पुण्यात सहलीसाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

पुणे : पुण्यातील सहलीसाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा मुळशी धरणात बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यात एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी पुण्यातील भारती विद्यापीठातील आहेत. या बुडालेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. संगीता नेगी, शुभम राज सिन्हा आणि शिव कुमार अशी या बुडालेल्या तीन विद्यार्थ्यांची नावे आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त काल …

three student died drowning, पुण्यात सहलीसाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

पुणे : पुण्यातील सहलीसाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा मुळशी धरणात बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यात एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी पुण्यातील भारती विद्यापीठातील आहेत. या बुडालेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. संगीता नेगी, शुभम राज सिन्हा आणि शिव कुमार अशी या बुडालेल्या तीन विद्यार्थ्यांची नावे आहेत.

महाराष्ट्र दिनानिमित्त काल सुट्टी असल्याने दहा विद्यार्थी वळणे गावात सहलीसाठी आले होते. रात्री जागरण केल्यानंतर आज सकाळी त्यातील काही जण मुळशी धरणात पोहोण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं हे तीन विद्यार्थी बुडाले. हे सर्व विद्यार्थी भारती विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेत होते.

दरम्यान सध्या मुळशी धरणातून बुडालेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या ठिकाणी इतर दोन विद्यार्थ्यांचा मृतदेह शोधण्याचं काम स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर सुरु आहे.

याआधी 9 एप्रिलला पवना धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या दोन इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. सुजीत जनार्दन घुले आणि रोहित राजकुमार कोडगिरे (21, रा. नांदेड) अशी या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *