बारामतीत वजन मापे निरीक्षकाला नगरसेवकाची धक्काबुक्की

बारामती : बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्यावर कारवाई केल्याने वजन मापे निरीक्षक योगेश अगरवाल यांना धमकावण्यात आलं आहे. बारामतीचे नगरसेवक सुनिल सस्ते यांनी वजन मापे निरीक्षकांना धमकी दिली आहे. यामुळे या नगरसेवकांवर आणि त्याच्या एका सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वीच वजनात तफावत आढळल्यानं माळेगाव कारखान्याचे वजनकाटे सील करण्यात आले होते. …

बारामतीत वजन मापे निरीक्षकाला नगरसेवकाची धक्काबुक्की

बारामती : बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्यावर कारवाई केल्याने वजन मापे निरीक्षक योगेश अगरवाल यांना धमकावण्यात आलं आहे. बारामतीचे नगरसेवक सुनिल सस्ते यांनी वजन मापे निरीक्षकांना धमकी दिली आहे. यामुळे या नगरसेवकांवर आणि त्याच्या एका सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपूर्वीच वजनात तफावत आढळल्यानं माळेगाव कारखान्याचे वजनकाटे सील करण्यात आले होते. यामुळे नगरसेवक सुनिल सस्ते यांनी अधिकाऱ्यांसोबत दमदाटी करण्याचा आणि दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आलं आहे.

बारामती येथील वजन मापे निरीक्षक योगेश अगरवाल यांनी काही दिवसांपूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची तपासणी केली होती. त्यामध्ये वजनात तफावत आढळल्यानं त्यांनी कारखान्याचे दोन वजनकाटे सील करत सात दिवसांत पुनर्तपासणीची नोटीस दिली होती. मंगळवारी दुपारी नगरसेवक सुनिल सस्ते हे आपल्या एका सहकाऱ्यासमवेत वजन मापे निरीक्षक योगेश अगरवाल यांना भेटण्यासाठी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर सुरुवातीलाच त्यांनी तुम्हाला लाज आहे का? कारखान्यावर का कारवाई केली असं म्हणत दमदाटी केली. तसेच त्यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न केला.

या प्रकारानंतर योगेश अगरवाल यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नगरसेवक सुनिल सस्ते यांच्यासह अन्य एकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच दमदाटी करुन दबाव आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस या प्रकरणावर अधिक तपास करत असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले.

 माळेगाव सहकारी साखर वजनकाट्यात आढळलेल्या तफावतीमुळे सभासदांमध्ये संभ्रम  झाला आहे. त्यातच आता थेट वजन मापे निरीक्षकांनाच दमदाटीचा प्रकार घडल्यानं वजनकाट्यातील  घोळाबाबत शंका उपस्थित होवू लागली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *