700 वर्षानंतर चैत्र नवरात्री अष्टमीला ग्रहांचा अनोखं मिलन, अनेक शुभ योगांची मांदियाळी

| Updated on: Mar 22, 2023 | 12:55 PM

सण उत्सवात ग्रहांची स्थितीमुळे उपासना आणखी फळते. त्यामुळे ग्रहांची साथ कशी आहे याकडे लक्ष लागून असतं. यंदा अष्टमीला ग्रहांचा असाच महासंयोग 700 वर्षांनी जुळून आला आहे.

700 वर्षानंतर चैत्र नवरात्री अष्टमीला ग्रहांचा अनोखं मिलन, अनेक शुभ योगांची मांदियाळी
चैत्र नवरात्रीतील अष्टमीला ग्रहांचा महामेळा, 700 वर्षानंतर पुन्हा असा योग
Follow us on

मुंबई : चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस देवी दुर्गेच्या विविध अवतारांचा जागर केला जात आहे. या नवरात्रोत्सवात 700 वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अष्टमी तिथीला ग्रहांचा महामेळा पाहायला मिळणार आहे. या दिवशी सात ग्रह चार राशींमध्ये गोचर करणार आहेत. यामुळे शुभ योगांची स्थिती निर्माण होणार आहे. दुर्गाष्टमी 29 मार्च 2023 रोजी आहे. या दिवशी भवानीदेवी उत्पत्ती किंवा अशोकाष्टमी असं देखील संबोधलं जातं. आर्द्रा नक्षत्र असून ग्रहांची उत्तम स्थिती असणार आहे.

देवगुरु बृहस्पती मीन राशीत विराजमान आहेत. मेष राशीत बुध ग्रह गोचर करणार आहे. सूर्यदेव मीन राशीत आणि शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. शुक्र ग्रह मेष राशीत गोचर करणार आहे. या राशीत राहु ग्रह आधीच ठाण मांडून बसला आहे. ग्रहांच्या या गोचरामुळे मालव्य, केदार, हंस आणि महाभाग्य योग तयार होत आहे.

मालव्य योग मेष राशीत शुक्राच्या गोचरामुळे तयार होत आहे. मीन राशीत हंस योग आणि लग्नेश सूर्य असल्याने महाभाग्य योग निर्माण होणार आहे. या योगामुले काही राशींना फायदा होणार आहे.

4 मार्चपासून शुक्र ग्रह मेष राशीत विराजमान आहे. यामुळे मालव्य योग निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक प्रभाव कन्या राशीच्या लोकांवर पडणार आहे. मिथुन राशीच्या जातकांना मालव्य आणि हंस योगाचा फायदा होईल. महाभाग्य योगामुळे मीन राशीच्या जातकांना चांगले दिवस सुरु होतील.

मिथुन – या राशीच्या जातकांना मीन राशीतील ग्रहांच्या युतीचा फायदा होईल. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. देवीच्या आशीर्वादामुळे व्यवसायात फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. या काळात काही शुभ बातमी मिळू शकते.

कर्क – ग्रहांच्या महासंयोगाच्या फायदा कर्क राशीच्या जातकानाही होईल. नोकरी आणि व्यवसायात चांगली फळं मिळतील. देवी दुर्गेच्या उपासनेमुले आर्थिक स्थिती चांगली राहील.

कन्या – या राशीच्या लोकांना ग्रहांची स्थिती फलदायी ठरेल. नवरात्रोत्सवात संपत्ती खरेदी करण्याचा योग जुळून येईल. बऱ्याच काळापासून अडकलेली कामं मार्गी लागतील.

मीन – या राशीच्या जातकांना ग्रहांच्या संयोगामुळे फायदा होईल. अडकलेली कामं पूर्ण होतील. कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. व्यवसायिक दृष्टीकोनातून राजयोग शुभ ठरेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)