Aries/Taurus Rashifal Today 28 July 2021 | नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांपासून अंतर ठेवा, गॅस आणि आम्लपित्तामुळे मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो

| Updated on: Jul 28, 2021 | 7:05 AM

कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य समन्वय साधल्यास घराची ऊर्जा सकारात्मक राहील. विवाहबाह्य संबंधांपासून दूर रहा.

Aries/Taurus Rashifal Today 28 July 2021 | नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांपासून अंतर ठेवा, गॅस आणि आम्लपित्तामुळे मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो
Aries_Taurus
Follow us on

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : मंगळवार 28 जुलै 2021 (Aries/Taurus Rashifal). आज बुधावर. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. बाप्पाची कुणावर कृपा असेल. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या बुधवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aries/Taurus Daily Horoscope Of 28 July 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today) –

मेष राशी (Aries), 28 जुलै

व्यस्त असूनही आपण निश्चितपणे आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढाल. कुटुंबातील सर्व सदस्य मनोरंजन आणि विनोदांमध्ये आनंददायी वेळ घालवतील. काही काळापासून दिनचर्येमध्ये आलेला गोंधळ दूर होण्यास सुरूवात होईल.

घरातल्या कोणत्या तरी सदस्याच्या आरोग्यासंबंधी तुमची दिनचर्या व्यस्त असेल. यामुळे आपली काही महत्त्वपूर्ण कामे देखील थांबू शकतात. यावेळी नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांपासून अंतर ठेवा. कोणीतरी तुमच्यावर आरोप लावण्याचे काम करू शकते.

मीडिया किंवा फोनद्वारे परस्परांतर्गत महत्त्वपूर्ण व्यावसायिक माहिती प्राप्त होईल. त्या माहितीच्या आधारे पूर्ण मेहनतीने आणि एकाग्रतेने पुढील कार्य सुरू ठेवा. याद्वारे तुमची आर्थिक स्थिती काही प्रमाणात चांगली होईल. पगारदार लोकांवर कामाचा ताण वाढतच जाईल.

प्रेमसंबंध – कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य समन्वय साधल्यास घराची ऊर्जा सकारात्मक राहील. विवाहबाह्य संबंधांपासून दूर रहा.

खबरदारी – गॅस आणि आम्लपित्तामुळे मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. आपला आहार आणि दिनक्रम संभाळा.

लकी रंग – व्हायलेट
लकी अक्षर – त
लकी क्रमांक – 3

वृषभ राशी (Tauras), 28 जुलै

मालमत्ता विक्री व खरेदीसंबंधित काही कार्यवाही सुरू असल्यास आज त्या कामांना योग्य यश मिळेल. घरात नातेवाईकांचे आगमन झाल्याने मनोरंजन व उत्साहाचे वातावरण असेल. तसेच कोणत्या ना कोणत्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन केले जाईल. परंतु आपल्या योजना व संबंधित गोष्टी इतरांना सांगू नका. कारण यामुळे काही लोक तुमचा द्वेषही करू लागतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, इजा किंवा अपघात होण्याची शक्यता आहे.

व्यावसायिक कार्यात थोडासा समजूतदारपणा दाखवल्यास तसेच काळजीपूर्वक काम केल्यास आर्थिक परिस्थिती चांगली होईल. सहकारी व कर्मचाऱ्यांचेही पूर्ण सहकार्य असेल. विविध प्रकारचे यश मिळण्याची वेळ आहे. त्या अनुषंगाने नियोजन करून कार्य करा.

प्रेमसंबंध – नवरा-बायकोच्या आयुष्यात चालू असलेल्या छोट्या-मोठ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. यामुळे संबंध सुधारतील. प्रेमसंबंधही भावनिक असतील.

खबरदारी – खोकला, सर्दी आणि अ‍ॅलर्जीसारख्या समस्या वाढू शकतात. सध्याच्या वातावरणापासून स्वत:ची काळजी घ्या.

लकी रंग – आकाश निळा
लकी अक्षर – क
लकी क्रमांक – 6

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…