
मुंबई : दिवाळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. दिवाळीपूर्वी 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी दुर्मिळ योग जुळून येणार आहे. 400 वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती असणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. 4 नोव्हेंबरला शनिवारी सकाळी 8 वाजता पुष्य नक्षत्र असणार आहे. हे नक्षत्र 5 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता संपणार आहे. त्यामुळे शनि आणि रवि पुष्य असा योग जुळून येणार आहे. इतकंच काय तर 4 नोव्हेंबरला गजकेसरी योगही असणार आहे. त्याचबरोबर शस योग तयार होणार आहे. हिंदू पंचांगानुसार, या दिवशी शंख, लक्ष्मी, शश, हर्ष, सरल, साध्य आणि मित्र योग तयार होत आहे. रविवारी म्हणजेच 5 नोव्हेंबरला रवि पुष्य योगासह रवि योग, सर्वार्थ सिद्धि योग, गजकेसरी योगासह श्रीवत्स, अमला, वाशि, सरल योग असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या स्थितीचा पाच राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
मेष : गुरु चांडाळ योगातून या जातकांची नुकतीच सुटका झाली आहे. त्यामुळे मेष राशीच्या जातकांना गुरुचं बळ मिळणार आहे. गुरुचं बळ आणि योगांची स्थिती यामुळे फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारेल. तसेच अडकलेली कामं पूर्ण होतील.
मिथुन : शनिच्या अडीचकीतून सुटका झाल्यानंतर ग्रहमान हवं तसं अनुकूल नव्हतं. आता हळूहळू सर्व काही सुरळीत होताना दिसेल. रागावर नियंत्रण ठेवा आणि कामाधंद्याकडे लक्ष द्या. कोणी आपलं वाईट केलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा.
कर्क : शनिचा प्रभाव सध्या या राशीवर आहे. त्यामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. असं असलं तरी काही योग दिलासादायक आहेत. त्याचा फायदा होईल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. पण वाणीवर नियंत्रण ठेवा.
धनु : शनिच्या साडेसातीतून नुकतीच सुटका झाली आहे. पण त्याचा प्रभाव काही काळ राहतो. शुद्धीत असलो तरी त्याला बळ लागतं. सध्या ग्रहांचं बळ लाभेल. पुढची रणनिती आखा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. आर्थिक घडी पुन्हा बसेल.
मकर : या राशीच्या जातकांना शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात बरीच उलथापालथ दिसून येईल. पण शनि महाराज शेवटच्या टप्प्यात देऊनही जातात हे लक्षात ठेवा. अहंकार दूर ठेवा आणि पाय जमिनीवर ठेवून व्यवहार करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)