Astrology: उद्यापासून पाच महिने गुरू वक्री अवस्थेत, कोणत्या राशींवर काय परिणाम होणार

5 महिने गुरू वक्री अवस्थेत असणार आहे. उद्या 29 जुलै 2022 रोजी गुरू वक्री होईल. दुसरीकडे, 17 जुलैला बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आणि अस्ताला गेला होता. 29 जुलैला उदय होणार आहे.

Astrology: उद्यापासून पाच महिने गुरू वक्री अवस्थेत, कोणत्या राशींवर काय परिणाम होणार
जोतिष्यशास्त्र
Image Credit source: Social Media
Nitish Gadge | Updated on: Jul 28, 2022 | 3:50 PM

गुरु ग्रह एका राशीत वर्षभर राहतो. त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. गुरू (Jupiter) ग्रहाचे मार्गक्रमण मेष ते मीन रास असे असते. आता गुरु ग्रह स्वत:च्या मीन राशीत आहे. मात्र आता 5 महिने गुरू वक्री अवस्थेत असणार आहे. उद्या 29 जुलै 2022 रोजी गुरू वक्री होईल. दुसरीकडे, 17 जुलैला बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आणि अस्ताला गेला होता. 29 जुलैला उदय होणार आहे. या बदलाचा काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ प्रभाव दिसून येईल. जाणून  घेऊया कोणत्या राशीवर काय परिणाम होणार आहे.

  1. वृषभ- गुरूची वक्री स्थिती वृषभ राशीसाठी फलदायी ठरेल. या काळात मान-सन्मान मिळेल. कुटुंबातील कलह दूर होतील. व्यवसाय तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात प्रगतीचे योग आहेत.
  2. मिथुन- या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे बुधाच्या उदयाचा फायदा या राशीच्या लोकांना होणार आहे. मिथुन राशीच्या गोचर कुंडलीतील दुसऱ्या स्थानात बुधाचा उदय होणारा आहे. या स्थानाला धन आणि वाणीचं स्थान म्हटलं जातं. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच व्यवसायात करार निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. वकील, मार्केटिंग आणि शिक्षकांसाठी हा काळ उत्तम असेल.
  3. कर्क- या कालावधीत कर्क राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव राहील. हातून धार्मिक कार्य घडतील. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल.
  4.  

    कन्या- मिथुन प्रमाणेच कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. कन्या राशीच्या गोचर कुंडलीतील अकराव्या स्थानात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. ज्योतिषशास्त्रात या स्थानाला महत्त्वाचं स्थान आहे. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचं स्थान म्हटलं जातं. या काळात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ आहे.

  5. तुळ-  या राशीच्या गोचर कुंडलीतील दशम स्थानात बुध ग्रहाचा उदय होत आहे. या स्थानाला व्यवसाय आणि नोकरीचं स्थान म्हटलं जातं. या काळात नवीन नोकरीचा प्रस्ताव येऊ शकतो. तसेच सध्या काम करत असलेल्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कामाचं देखील कौतुक होईल.
  6. वृश्चिक- या राशीच्या लोकांची अडकलेली कामं मार्गी लागतील. नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळतील. आरोग्यविषयक समस्या दूर होतील. तसेच कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.
  7. कुंभ- या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होतील. गुंतवणुकीसाठी या काळ चांगला ठरेल. वैवाहिक जीवनातील कलह दूर होतील. तसेच अचानक धनलाभ होईल.
  8. मीन- या काळात परदेश यात्रेचा योग जुळून येईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तसेच नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us