Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना मिळणार महागडी भेटवस्तू

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार आजचा दिवस. कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार शुभवार्ता

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना मिळणार महागडी भेटवस्तू
आजचे राशी भविष्य
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 27, 2022 | 7:04 AM

मुंबई,  ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- लांबच्या प्रवासाचा योग आहे. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. इतरांची मनं ओळखायला शिका.
  2. वृषभ- नवं घर खरेदी करण्याची योजना आखाल. कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. आर्थिक नियोजनाचा फायदा होणार आहे.
  3. मिथुन- गृहकलह संपणार आहे. व्यापारात भरभराट होणार आहे. जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे.
  4. कर्क- मनात असणाऱ्या सर्व चिंता मिटणार आहेत. अभ्यासावर लक्ष द्या. खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा.
  5. सिंह- कर्जानं घेतलेले पैसे फेडण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील अडचणी दूर होणार आहेत.
  6. कन्या- मोठ्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करा. नवं वाहन खरेदी कराल. नातेसंबंध सुधारणार आहेत.
  7. तुळ- महागडी भेटवस्तू मिळू शकते. विचारपूर्वक गुंतवणूक करा. नव्या कामांचा फायदा तुम्हाला होणार आहे.
  8. वृश्चिक- नात्यांमध्ये सावध राहा. व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. कोणाशीही वाद घालू नका.
  9. धनु- मोठ्याच्या आशिर्वादानं पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. घर स्वच्छ ठेवा. सकारात्मकता नांदेल.
  10. मकर – नोकरीमध्ये बदल करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या. कर्जाऊ पैसे परत मिळणार आहेत.
  11. कुंभ – सायंकाळपर्यंत एखादी शुभवार्ता कळणार आहे. महत्त्वात्या वस्तू सांभाळा. मित्रांची साथ मिळणार आहे.
  12. मीन- दुपारपर्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करा. अचानक एखादी दुखापत होऊ शकते. काळजी घ्या. जोडीदाराचा आदर करा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)