AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून होणार फायदा

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार. कोणत्या राशीच्या लोकांना होणार जुन्या गुंतवणुकीतून फायफ

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून होणार फायदा
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 26, 2022 | 6:26 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष – या राशीच्या लोकांनी त्यांच्या बोलण्याचे मूल्य समजून घेतले पाहिजे.  घरासाठी केलेली जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पाठदुखीची शक्यता आहे. विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल.
  2.  वृषभ – व्यापाऱ्यांनी कोणताही नवीन प्रकल्प घाईगडबडीत सुरू करू नये, आधी त्याच्या सर्व बाबींचा बारकाईने विचार करा. पति-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात. हंगामी आजार होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्यावी.
  3.  मिथुन – मिथुन राशीच्या लोकांना कार्यालयीन कामानिमित्त्य  इतर शहरात जावे लागू शकते, यासाठी त्यांनी तयारी ठेवावी. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी आज चांगला नफा कमवू शकतील.  तरुणांनी नवीन नातेसंबंधांमध्ये योग्य अंतर राखले पाहिजे, जास्त वेगाने जवळ येणे चांगले नाही.
  4.  कर्क – कामांचा आळस करणे महागात पडेल. पित्ताचा त्रास संभवतो. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आर्थिक व्यवहारात डोळसपणे विश्वास ठेवा. फसवणूक होण्याची शक्यता आहे. प्रलोभनांना बळी पडू नये.
  5. सिंह – कार्यालयीन कामाचे कौतुक होईल. व्यापार्‍यांना परदेशी कंपन्यांकडून चांगल्या ऑफर मिळू शकतात. तत्वाने वागा. क्षणिक नफ्यासाठी तत्वांशी तडजोड करू नका. भावंडांसोबत दिवस आनंदात जाईल.
  6. कन्या – या राशीच्या लोकांवर कार्यालयात कामाचा अतिरेक झाल्यामुळे दबाव वाढेल. आज व्यवसाय सामान्य राहील. पोटाशी संबंधित आजार जसे की बद्धकोष्ठता, गॅसची समस्या जाणवेल. वडिलोपार्जित व्यावसायिक लोकांशी संबंध आणि संपर्क मजबूत करून नफा कमवू शकतील.
  7. तूळ – बोलण्यावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबतचे मतभेद संपुष्टात येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
  8. वृश्चिक- मानसिक ताण हलका होईल. धार्मिक कामात मन रमेल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होणार नाही याची काळजी घ्यावी. नवीन ओळखीतून उत्पन्नाचे मार्ग खुलतील. दिवस आनंदात जाईल.
  9. धनु- आजचा दिवस धावपळीचा राहील. जबाबदारीने कामं करावी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रलोभनांपासून दूर राहा. समाधानी वृत्ती ठेवल्याने भविष्यातील हानी टळेल.
  10. मकर- मानसिक ताण जाणवू शकतो. धार्मिक कार्यानिमित्त्य प्रवास संभवतो. मनाविरुद्ध निर्णय घेऊ नका. सामाजिक कार्यक्रमात मान मिळेल. पैशांचा अपव्यय टाळा.
  11.  कुंभ- मोठे निर्णय पुढे ढकलावे. आत्मविश्‍वासात ठेवा आणि स्वतःमध्ये नेतृत्व विकसित करा. जोडीदाराचे वागणे संशयास्पद वाटू शकते. कुटुंबातला कलह थांबविण्यासाठी पुढाकार घ्या.
  12.  मीन- सहलीला जाण्याचा बेत आखाल. इतरांचे मन जपण्यासाठी मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक सुबत्ता लाभेल. व्यसनांपासून दूर राहा. वाताचा त्रास संभवतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा