AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Welcome-2023: नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘या’ राशिच्या लोकांना होऊ शकतो धनलाभ

जाणून घ्या वर्षाचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा जाणार, आज अडकलेली कामे पूर्ण होतील.

Welcome-2023: नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'या' राशिच्या लोकांना होऊ शकतो धनलाभ
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 01, 2023 | 2:05 PM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष :  आज तुम्ही व्यवसायात काही नवीन बदल करू शकता. आर्थिक लाभ संभवतो. लव्ह लाईफसाठी दिवस अनुकूल नाही. डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्याता आहे.
  2. वृषभ :  व्यावसायिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत, इतरांवर विश्वास ठेवू नका. चुकीच्या आहारामुळे आरोग्य बिघडू शकते. आज तुमच्या वागण्यामुळे लोकांकडून तुमची प्रशंसा होईल.ऊ शकतात.
  3. मिथुन : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. ग्रहांच्या कृपेने नोकरीत बढती होण्याचा योग आहे. विवाह इच्छुकांना लग्नासाठी मागणी येईल. हंगामी आजारापासून काळजी घ्यावी.
  4. कर्क राशी: आज तुम्ही उत्साहाने काम कराल. सरकारी नोकरदारांना लाभ मिळेल. व्यावसायिक या दिवशी अधिक खर्च करू शकतात. नवीन मालमत्ता खरेदीसाठी दिवस अनुकूल आहे.
  5. सिंह: या राशीच्या व्यावसायिकांनी या दिवशी प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. प्रकृती उत्तम राहील. ऑफिसमध्ये बॉसचे सहकार्य मिळेल. यश आणि कीर्ती वाढेल.
  6. कन्या: आजचा दिवस खूप व्यस्त असेल. तब्येत बिघडू शकते. व्यावसायिकांना आज भागीदारीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
  7. तूळ: आर्थिक स्थिती मजबूत राहील. अडकलेला पैसा मिळू शकतो. कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. ऑफिसमधील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील.
  8.  वृश्चिक: आज अडकलेली कामे पूर्ण होतील. पैसे खर्च करताना काळजी घ्या. नोकरदारांनी कार्यालयातील सहकाऱ्यांशी सावध राहावे. रागावर नियंत्रण ठेवा.
  9.  धनु : व्यवसायात काही बदल होऊ शकतात. धनलाभ होईल. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. प्रेम प्रकरणासाठी दिवस चांगला आहे.
  10. मकर : आज व्यवसायात प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. या राशीचे लोक स्पर्धेमध्ये व्यस्त राहतील. आज तुम्ही जमीन खरेदी करू शकता.
  11.  कुंभ : जीवनसाथीसोबतचे संबंध दृढ होतील. इतरांमुळे पैशाची हानी होऊ शकते. प्रत्येक काम पूर्ण करण्यात यश मिळेल. कुटुंबियांशी कोणत्याही वादात पडू नका.
  12.  मीन : आज तुम्हाला सहज कर्ज मिळेल. प्रेमसंबंध चांगले राहतील. जास्त खर्च करू नका. प्रतिष्ठित व्यक्तीची भेट लाभदायक ठरेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!