Dhanu Rashifal 2023: धनू राशीसाठी कसे जाणार 2023 वर्ष, कोणत्या महिन्यात होणार सर्वाधिक धनलाभ?

शनीची साडेसाती पूर्ण झाल्यानंतर सुखाचा वर्षाव होणार आहे. शनीदेव आपल्या भाग्याचे व गुरु ग्रह आपल्या लाभाचे रक्षण करणार आहेत.

Dhanu Rashifal 2023: धनू राशीसाठी कसे जाणार 2023 वर्ष, कोणत्या महिन्यात होणार सर्वाधिक धनलाभ?
धनू राशी
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jan 01, 2023 | 2:16 PM

मुंबई, मावळत्या वर्षाला निराेप देत 2023 या नव वर्षाची उत्सुकता सर्वानाच लागलेली आहे. धनू राशीसाठी पुढील वर्ष 2023 कसे राहील? (Sagittarius Horoscope 2023) तुमची मेहनत करिअर, नोकरी किंवा व्यवसायात यशस्वी होईल का? पुढील वर्ष तुमच्यासाठी कसे असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? नक्कीच तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की लाल किताबानुसार तुमचे भविष्य कसे असेल? याबद्दल जाणून घेऊया.

करिअर आणि व्यवसाय

शनीची साडेसाती पूर्ण झाल्यानंतर सुखाचा वर्षाव होणार आहे. शनीदेव आपल्या भाग्याचे व गुरु ग्रह आपल्या लाभाचे रक्षण करणार आहेत. यामुळेच आपल्याला येत्या काळात प्रचंड धनलाभ होऊ शकतो. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी येणारे वर्ष लाभदायी ठरू शकते. शुभ प्रसंगी खर्च होऊ शकतो पण यामुळे तुमच्या बजेटवर परिणाम होणार नाही. येत्या काळात वाहन व प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत.

जानेवारी ते मार्च हा काळ शुभ राहील

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या तिमाहीत मांगल कार्य होतील. विवाह इच्छूकांचे विवाह जुळतील. सामाजिक कार्यात रस घ्याल.  आवश्यक कामे लवकर पूर्ण करा. भाग्याची साथ लाभेल. चांगली बातमी मिळेल.

जुलै ते सप्टेंबर या काळात या गोष्टी लक्षात ठेवा

जुलै ते सप्टेंबर या तिसर्‍या तिमाहीत समंजसपणाने  पुढे जावे लागेल. वडीलधाऱ्यांशी नम्रतेने व प्रेमाने वागावे. आरोग्याशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. छोट्या छोट्या गोष्टींवर अतिसंवेदनशील होऊ नका. फक्त आपल्या मार्गावर पुढे जात रहा. आर्थिक बाबतीत समतोल राखा. प्रेमाच्या बाबतीत पुढाकार टाळा. धीर धरा. स्मार्ट काम करण्यावर भर द्या. दिनचर्या नियमित ठेवा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)