AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशीभविष्य 5 June 2025 : भाड्याच्या घरात राहत असाल तर… आजचं भविष्य काय ?

Horoscope Today 5 June 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 5 June 2025 :  भाड्याच्या घरात राहत असाल तर... आजचं भविष्य काय ?
आजचं राशीभविष्यImage Credit source: social media
| Updated on: Jun 05, 2025 | 7:36 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 5 June 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आज आर्थिक क्षेत्रात चढ-उतार येतील. आर्थिक बाबी स्पष्ट करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे लागेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. व्यवसायात नवीन भागीदार फायदेशीर ठरतील. जमा बांडवलात वाढ होईल.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आज कामाच्या ठिकाणी चढ-उतार येतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अनावश्यक वाद होऊ शकतात. व्यवसायात अनावश्यक अडथळ्यांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. आज बराच संघर्ष करावा लागेल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आज घराबाबत काही समस्या जाणवू शकते. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर घरमालक तुम्हाला ते रिकामे करण्यास सांगू शकतो. तुमच्या स्वतःच्या घरात राहत असाल तर तुम्ही जुने घर रिकामे करून नवीन घरात जाऊ शकता.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आज आर्थिक बाबींमध्ये काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या. घाईघाईत पैसे गुंतवू नका. मालमत्तेशी संबंधित खरेदी-विक्रीसाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. महत्वाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी, फायदेशीर आणि प्रगतीशील असेल. कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होईपर्यंत ते उघड करू नका. अन्यथा, काम बिघडू शकते. तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आज तुमचे आरोग्य चांगले राहील. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या येण्याची शक्यता कमी असेल. बाहेर प्रवास करताना खाण्यापिण्याच्या बाबतीत संयम बाळगा.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

आज तुम्हाला आरोग्याच्या किरकोळ समस्या सतावतील. तुमची दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. सहकाऱ्यांशी समन्वय साधण्याची गरज भासेल. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे कमी होतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळतील. काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने आर्थिक लाभ होतील. तुमच्या वडिलांकडून अपेक्षित आर्थिक मदत मिळेल. व्यवसायात उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आज तुमचा नोकरीचा शोध पूर्ण होईल. चांगलं काम मिळेल. महत्त्वाच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना बाहेरच्या देशात जावे लागू शकते.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

आज कुटुंबात अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही तुमचा राग आणि कठोर शब्दांवर नियंत्रण ठेवावे. अन्यथा भांडणे गंभीर वळण घेऊ शकतात. तुम्हाला नोकरीच्या संधी मिळतील.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

आज व्यवसायात चांगले उत्पन्न असल्याने आर्थिक स्थिती मजबूत असेल. पैशाच्या मदतीने काही महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. यामुळे भविष्यात आर्थिक लाभ होतील.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...