
Tijori upay : ज्योतिषशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जो उपाय म्हणून अनेक जण करत असतात. आपल्या किचनमध्ये आढणारी हळद देखील एक महत्त्वाचं काम करु शकते. हळदी ही आरोग्यासाठी चांगली तर आहेच पण ज्योतिषशास्त्रात देखील त्याचे महत्त्व सांगितले आहे. तिजोरीमध्ये हळद ठेवल्यास तुमचे नशीब उजळवू शकते. जाणून घ्या हळदीचे काय आहेत हे उपाय.
ज्योतिष शास्त्रानुसार तिजोरीत हळदीचा एक गोळा ठेवले तर ते शुभ मानले जाते. तिजोरीत एका लाल कपड्यात हळदीचा एक गोळा बांधून ठेवावा. यामुळे तिजोरीत कधीही पैशांची कमतरता भासणार नाही.
तिजोरीत हळद ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हळदीचा गोळा तिजोरीच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात असावा. या दिशेला हळदीचा गोळा ठेवल्याने ते सर्वात शुभ मानले जाते. तिजोरी नेहमी उत्तर-पूर्व दिशेला ठेवावी.
तिजोरीत हळदीचा गोळा ठेवल्यास यामुळे चोरीची शक्यता देखील कमी होते, असा समज आहे. असे म्हटले जाते की हळद सर्वत्र सकारात्मक ऊर्जा निर्माण करते जी गोष्टी सुरक्षित ठेवण्यास मदत करते.
तिजोरीत तांदळाच्या दाण्यांसोबत हळदीचा एक गोळा ठेवल्यास कुठेही अडकलेले पैसे परत मिळतात. जर एखाद्या व्यक्तीचा पैसा बराच काळ अडकला असेल तर तो हे उपाय करू शकतो.
जर एखाद्या व्यक्तीला अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी 11 हळदीच्या गाठींचा हार बनवून गणेशाला अर्पण करावा. यामुळे नक्कीच यश मिळेल.
सूचना – वरील दिलेली माहिती ही ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. टीव्ही ९ मीडिया या बाबत कोणाताही दावा करत नाही.