आजचे राशीभविष्य 26 December 2025 : नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कोणाला मिळणार आज नवी संधी?

Horoscope Today 26 December 2025, Friday in Marathi: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 26 December 2025 : नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कोणाला मिळणार आज नवी संधी?
horoscope
| Updated on: Dec 26, 2025 | 8:09 AM

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 26 December 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस गोंधळात टाकू शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना सदस्यांची नाराजी ओढवून घेऊ नका. व्यवसायानिमित्त छोटी सहल होईल. परदेशात जाण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. कोणालाही पैसे उधार देणे टाळा, कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांची आज प्रलंबित कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत प्रवासाचा योग आहे. करिअरच्या काळजीत असलेल्यांना नवीन नोकरीची संधी मिळेल. गुंतवणुकीचे नियम नीट समजून घ्या. वरिष्ठ आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांचे आज कामात मन लागणार नाही, अस्वस्थता जाणवेल. व्यावसायिकांनी सावध राहावे, चढ-उतार संभवतात. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. जुन्या गुंतवणुकीतून नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांनी ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस असेल. मुलांच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या योजना आखाल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. घर नूतनीकरणाचे काम आज सुरू करू शकता. सुखसोयींवर खर्च होईल, ज्यामुळे विरोधकांचा जळफळाट होऊ शकतो.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना आज भागीदारीच्या व्यवसायातून तुम्हाला विशेष आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक मतभेद टाळण्यासाठी घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. मुलांना दिलेली आश्वासने पूर्ण केल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जुन्या चुकांमधून धडा घेऊन भविष्यातील योजनांवर लक्ष केंद्रित करा.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

कन्या राशीच्या लोकांची तुमच्या परोपकारी स्वभावामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मात्र बोलताना संयम ठेवा. आर्थिक चणचण भासत असल्यास बँक किंवा संस्थेकडून कर्ज मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तरच अपेक्षित यश मिळेल. लोकांच्या गैरसमजाकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर ठाम राहा.

तूळ राशी (Libra Daily Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना आज आळस सोडून कामाला लागल्यास प्रलंबित कामे वेळेत पूर्ण होतील. जोडीदाराच्या खंबीर साथीमुळे भविष्यातील आर्थिक नियोजनाला गती मिळेल. विरोधक किंवा प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुलांसाठी काही खरेदी करण्याचे योग येतील, ज्यामुळे संध्याकाळ उत्साहात जाईल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टीने मजबूत राहील आणि व्यवसायात नवीन करार होतील. मालमत्तेचे व्यवहार करताना कागदपत्रांची पडताळणी करा, फसवणुकीची शक्यता आहे. आरोग्याकडे, विशेषतः डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. हनुमानजींच्या उपासनेमुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होईल.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल आणि प्रगतीचे मार्ग मिळतील. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवले नाही तर आर्थिक ओढताण होण्याची शक्यता आहे. मुलांच्या संदर्भात आज तुम्हाला एखादा कठोर पण महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेटीमुळे तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

मकर राशीच्या लोकांच्या कुटुंबात आज आनंदाचे वातावरण राहील. भावंडांच्या विवाहाचे प्रश्न सुटतील. कामाचा ताण स्वतःवर हावी होऊ देऊ नका, अन्यथा आरोग्यावर परिणाम होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमची मोठी चिंता दूर होईल. जप केल्याने मनाला शांती मिळेल आणि कामात यश येईल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना आज तुमच्या अचूक निर्णयक्षमतेमुळे व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधातील जुने तणाव निवळतील. जोडीदाराशी जवळीक वाढेल. अनोळखी व्यक्तींवर अतिविश्वास ठेवणे आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरु शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज एखादी चांगली संधी मिळेल.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

मीन राशीचे लोकांनी आज कामाच्या ठिकाणी बदल करण्याचे तुमचे विचार वरिष्ठांना पटतील आणि पाठिंबा मिळेल. जोडीदाराकडून मिळालेल्या बातमीमुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि उत्साही राहील. व्यवसायात घाईघाईने मोठे आर्थिक निर्णय घेणे आज टाळलेलेच बरे ठरेल. पालकांशी संवाद वाढवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्यास लाभ होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)