Horoscope Today 28th July 2026 : आज मोठा जॅकपॉट लागेल, या राशीची आज पाचही बोटं तुपात.. ही तुमची रास आहे का ?

Horoscope Today 28th July 2026, Tuesday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य. दैनिक राशिफल (Horoscope Today 28th July 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे.

| Updated on: Jul 28, 2026 | 7:30 AM
1 / 12
मेष राशी (Aries Daily Horoscope) -    आजचा दिवस आनंद,  मजा, हास्य आणि उत्साहाने भरलेला असेल. मनाला सतत काहीतरी मजेशीर करण्याची ओढ लागेल. मित्राच्या एखाद्या बोलण्यामुळे क्षणभर मन दुखावले जाऊ शकते, पण ती गोष्ट मनावर न घेता हसत पुढे जाणेच शहाणपणाचे ठरेल. बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आई-वडिलांचा सल्ला नक्की घ्या—तो तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो. जुन्या मित्राची भेट झाल्यास भूतकाळातील वाद उकरून काढू नका, अन्यथा आनंदाचे क्षण वादात बदलू शकतात.

2 / 12
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) - आज तुमची मेहनत सर्वांच्या नजरेत भर पडेल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा अधिक उजळेल आणि नवीन जबाबदारी किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठांसोबत किरकोळ मतभेद होऊ शकतात, पण शांत आणि संयमी राहिल्यास परिस्थिती सहज हाताळता येईल. मुलांची एखादी छोटी इच्छा पूर्ण केल्याने मनाला समाधान मिळेल. तुम्ही सर्वांचे भले करण्याचा प्रयत्न कराल, जरी काही लोक तुमच्या भावना समजून घेणार नसले तरी.

3 / 12
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) - कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती तुम्हाला चुकीचा सल्ला देण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. वडिलांच्या बोलण्यामुळे मनाला थोडा त्रास होईल, पण हा गैरसमज लवकरच दूर होईल. प्रवासात एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते, जी भविष्यात मोठा फायदा करून देईल. आज संयम आणि शहाणपण हेच तुमचे सर्वात मोठे बळ असेल. नाराज असलेल्या जवळच्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात पुन्हा गोडवा येईल.

4 / 12
कर्क राशी (Cancer Daily Horoscope) - आजचा दिवस आनंद आणि जबाबदाऱ्यांचा सुंदर समतोल साधणारा असेल. कुटुंबात लग्नाची आनंदवार्ता मिळाल्याने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळू शकते. स्वतःसाठी काहीतरी खास खरेदी करण्याचा विचार कराल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल आणि उत्पन्न वाढण्याचीही शक्यता आहे.

5 / 12
सिंह राशी (Leo Daily Horoscope) - आजचा दिवस धावपळीचा असला तरी यश मिळवून देणारा ठरेल. अनेक कामे एकाच वेळी पूर्ण करण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे घाई न करता शांतपणे निर्णय घ्या. आईचा सल्ला तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. घरात नवीन पाहुण्याच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भूतकाळातील एका चुकीतून आज महत्त्वाचा धडा मिळेल.

6 / 12
कन्या राशी (Virgo Daily Horoscope) - आज संयम आणि शहाणपण हेच तुमचे सर्वात मोठे बळ असेल.  भागीदारीतील व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा, कारण फसवणुकीची शक्यता आहे.  जुन्या मित्राची भेट होईल.

7 / 12
तुळ राशी (Libra Daily Horoscope) - सहलीला जाण्याचा प्लान ठरेल. आज मोठा जॅकपॉट लागेल, वडीलोपार्जित मालमत्तेच्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लागणार, मोठी धनराशी मिळणार. गुंतवणूक सावध करा, पैसे उडवू नका.

8 / 12
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) -  आज आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे मनात समाधानाची भावना निर्माण होईल. मात्र, सहकाऱ्याच्या एखाद्या बोलण्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते. तुमचे धैर्य आणि संयम प्रत्येक परिस्थितीत तुमची ताकद ठरतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. घरातील सुखसोयी वाढवण्याचा विचार कराल आणि मालमत्तेशी संबंधित एखादी लाभदायक संधी मिळू शकते.

9 / 12
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) - आज तुमच्या आयुष्यात आराम, सुविधा आणि सकारात्मक बदल वाढतील. वडिलांसोबत एखाद्या गोष्टीवर मतभेद होऊ शकतात, पण परिस्थिती लवकरच सुधारेल. व्यवसायात चढ-उतार असले तरी शेवटी फायदा तुमच्याच बाजूने राहील. नवीन कल्पना तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करू शकतात, त्यामुळे त्यावर लगेच काम सुरू करा. राजकारणाशी संबंधित व्यक्तींनी स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवावा.

10 / 12
मकर राशी (Capricorn Daily Horoscope) -  आजचा दिवस शांततेत जाईल, पण बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. इतरांच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप टाळा. वडिलांच्या एखाद्या बोलण्यामुळे मनाला लागेल, पण भावंडांची साथ तुमचा आत्मविश्वास वाढवेल. अविवाहित व्यक्तींना प्रिय व्यक्तीची आठवण येऊ शकते. भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. जुन्या चुका आठवून त्यातून शिकणेच आजचा सर्वात मोठा धडा ठरेल. मोठा फायदा होईल, धनलाभाची शक्यता आहे.

11 / 12
 कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) -  आज व्यवसायात विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. छोट्याशा दुर्लक्षामुळे मोठे नुकसान होऊ शकते. भागीदारीतील व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा, कारण फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नका; आवश्यक तपासण्या करून घेणे हिताचे ठरेल. प्रवासाचा विचार करत असाल तर आईचा सल्ला तुमच्यासाठी शुभ ठरेल. आज सावधगिरीच तुमचे सर्वात प्रभावी शस्त्र असेल.

12 / 12
मीन राशी (Pisces Daily Horoscope) - आज तुमच्यात नवीन सुरुवात करण्याचा उत्साह ओसंडून वाहील. मात्र, घाईगडबडीत निर्णय घेण्याऐवजी संयम राखा. मुलं तुमच्या अपेक्षांवर खरी उतरतील आणि घरातील सुखसोयींमध्ये वाढ होईल. मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. जवळच्या लोकांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रवासादरम्यान मिळालेली एखादी माहिती भविष्यात मोठी संधी बनू शकते. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us