AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Transit 2023: या राशीच्या लोकांवर राहाणार शनीदेवाची कृपा, सर्व आर्थिक समस्या होतील दुर, तुमची रास यात आहे का?

ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाची वक्रदृष्टी त्रासदायक असते. तसेच शनिदेव जर एखाद्यावर प्रसन्न झाले तर त्याचे दिवस बदलायला वेळ लागत नाही.

Shani Transit 2023: या राशीच्या लोकांवर राहाणार शनीदेवाची कृपा, सर्व आर्थिक समस्या होतील दुर, तुमची रास यात आहे का?
शनिदेव Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 03, 2023 | 4:55 PM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही ग्रहाच्या संक्रमणाला विशेष महत्व आहे. याचा थेट परिणाम सर्व राशीच्या राशीच्या लोकांवर होतो. 17 जानेवारी रोजी, न्यायाची देवता शनीचे (Shani Transit 2023) कुंभ राशीत संक्रमण होणार आहे. अशा स्थितीत काही राशीचे लोकं साडेसाती आणि अडिचकीच्या महादशापासून मुक्त होतील. 16 जानेवारीचा काळ काही राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल.

ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाची वक्रदृष्टी त्रासदायक असते. तसेच शनिदेव जर एखाद्यावर प्रसन्न झाले तर त्याचे दिवस बदलायला वेळ लागत नाही.

16 जानेवारीपर्यंत शनिदेव मकर राशित असणार आहेत. यानंतर ते 17 जानेवारीला 30 वर्षांनंतर, कुंभ राशित प्रवेश करतील. 16 जानेवारीपर्यंतचा काळ वृषभ, वृश्चिक, मीन राशिंच्या लोकांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल.

जाणून घेऊया या राशींना काय फायदा होणार आहे

  1. वृषभ- ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. या काळात वृषभ साशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात केलेल्या मेहनतीचे त्यांना पूर्ण फळ मिळेल. एवढेच नाही तर त्या व्यक्तीला कौटुंबिक सुख आणि समृद्धीही मिळेल. या काळात घर अथवा वाहन आदी खरेदी करू शकता. मेहनतीचे फळ मिळेल. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठीही हा काळ शुभ असणार आहे.
  2. वृश्चिक- या राशीच्या लोकांना त्यांच्या सर्व कार्यात यश मिळेल. या काळात त्यांची आर्थिक बाजू भक्कम राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील, तसेच नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. कुटुंबासोबत हा काळ चांगला जाईल. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना शनिदेवांची विशेष कृपादृष्टी राहील. मात्र, 16 जानेवारीनंतर या राशीच्या लोकांवर शनी अडिचकीचा प्रकोप सुरू होईल.
  3. मीन- ज्योतिषशास्त्रानुसार शनि मकर राशीत असल्याने मीन राशीच्या लोकांना शत्रूंवर विजय मिळवता येईल. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 16 जानेवारीपर्यंतचा काळ या राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल. आपल्याला लवकरच आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल. जे लोक परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना या काळात यश मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...