Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 21 मार्च 2023, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता

| Updated on: Mar 21, 2023 | 12:05 AM

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 21 मार्च 2023, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता
राशी भविष्य
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

आजचे बारा राशींचे राशी भविष्य

मेष

आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजाश्रय लोभल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. महिला वर्गाना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता येईल. कौटुंबिक पातळीवर समाधानी रहाल. भाऊबहिणीकडून पाठबळ मिळेल. भांवडाकडून आर्थिक मदतीची शक्यता आहे. सुखात समाधानात वृद्धी करणारा दिवस आहे. वाहन घर खरेदीचा योग आहे. स्थावर मालमत्तेत वाढ होईल. सुखकारक दिनमान असेल.

वृषभ

अकस्मात धनलाभ होऊ शकतात. सामाजिक कार्यात मान सम्मान वाढेल. गृहसौख्यात उत्तम संयोग राहील. प्रसन्नतापूर्ण आणि आंनदी मन रहिल. आध्यात्माकडे ओढ राहिल. वाहन स्थावर जंगम मालमत्ता यात वृद्धी होईल. व्यापारी वर्गासाठी धन वृद्धिचा दिवस आहे. सरकारी कामकाजात यश येईल. गृहसौख्य उत्तम लाभेल. कुटुंबाविषयी स्नेह वाढेल. उत्तम दिनमान आहे. मुलाकडून आंनदाची बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. वैवाहिक जीवनात प्रेम व आपुलकी राहील.

हे सुद्धा वाचा

मिथुन

भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. स्वभावात राग मस्तर निर्माण होईल. धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. नास्तिकता वाढीस लागेल. अनाठायी खर्च होईल. कामात रिस्क घेवू नका. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. आनंदावर विरजण पडण्यासारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्च वाढणार आहे. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे.

कर्क

नवीन प्रकल्प कामे मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहिल. व्यापारात नफ्यात वाढ होणार आहे. कौटुंबिक सौख्य ही उत्तम लाभेल. नवनवीन कल्पना सुचतील आणि आमलातही आणाल. मनोधैर्य चांगलेच उचांवेल. कला क्षेत्रातील मंडळींनी या शुभ दिनाचाफायदा करून घ्यावा. जोडीदाराकडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल. मन आंनदी राहिल.

सिंह

नोकरीत बदल किंवा बढतीचे प्रबल योग आहेत. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहिल. मानसिक स्वास्थ लाभेल. प्रवासातुन लाभ होतील.

कन्या

नोकरीत स्थान बदलाची उत्तम संधी आहे. बढ़ती व प्रमोशनचे योग आहेत. आजचा दिवस सफलतापूर्वक व्यतीत कराल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य लाभेल. व्यापारात नविन योजनाची सुरुवात होऊ शकते. जुनी येणी वसुल होतील. उत्पनाचे स्तोत्र वाढतील. राजकिय, सामाजिक कलाक्षेत्रातील व्यक्तींना योग्य लाभ व मानसन्मान प्राप्त होईल. शैक्षणिक कार्यात बौद्धिक कार्यात यश लाभेल. परदेशगमन होईल. प्रवासातून लाभ आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

तुला

कलाकारांसाठी विशेषत: उत्तम दिवस आहे.आर्थिक स्थिती चांगली राहिल. व्यवसायिकांना नफ्यात वाढ होईल. गृहसौख्य उत्तम राहील. दिवसभर मन प्रसन्न असेल. पत्नी सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. नोकरी व्यवसायात स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या. आपल्याला यश नक्की मिळेल. शासकीय कामकाजात दिनमान उत्तम आहे. नवीन योजनाची सुरूवात होईल. परमेश्वरावर श्रद्धा वाढेल. आध्यात्मिक कार्य घडेल.साधु संत दर्शन घडेल.

वृश्चिक

व्यापारात भागीदारीत नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. विद्याभ्यासात प्रगती राहिल. संशोधनपर केलेल्या कामास मानसन्मान पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा.

धनु

आपणा विषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे आज टाळा. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. दुरवरचे प्रवास टाळावेत. आरोग्याबाबतीत विशेष लक्ष द्यावे.

मकर

नोकरीत अतिउत्साही आणि अतिरक पणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे.

कुंभ

तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. प्रेमप्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. मनोबल उंचावेल. मनशांती लाभेल.

मीन

व्यापारात बदल प्रगती घडविणारे ठरतील. नोकरदार वर्ग कलाकारांना प्रसिद्धि बरोबर यश मिळवून देणारा योग आहे. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. अचानक आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायिकांना योजना पद्धतीने केलेल्या कामामुळे आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. तरुण तरुणींना नोकरी मिळण्यासाठी उद्याचा दिवस उत्तम राहाल. स्पर्धेमध्ये यश मिळेल. एकंदरीत आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणारा दिवस आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)