AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine Day 2023: या राशीच्या लोकांना मिळणार खरे प्रेम, तुमच्या राशीसाठी कसा जाणार ‘व्हॅलेंटाईन डे’

काही लोकांच्या लव्ह लाईफमध्ये प्रेमाची छटा असणार आहे. जाणून घेऊया आजचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी लकी आहे.

Valentine Day 2023: या राशीच्या लोकांना मिळणार खरे प्रेम, तुमच्या राशीसाठी कसा जाणार 'व्हॅलेंटाईन डे'
प्रेम दिवसImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 14, 2023 | 11:51 AM
Share

मुंबई, 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेम दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2023) म्हणून साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा प्रेम-रोमान्सचा कारक आहे आणि यावेळी तो कुंभ राशीमध्ये शनि-सूर्याशी संयोग करत आहे. शनि-शुक्र आणि सूर्याच्या या संयोगाचा सर्व 12 राशींच्या प्रेम जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. दुसरीकडे, काही लोकांच्या लव्ह लाईफमध्ये प्रेमाची छटा असणार आहे. जाणून घेऊया आजचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी लकी आहे.

तुमच्या राशीसाठी कसा जाणार आजचा दिवस

मेष -खरे प्रेम मिळेल

या राशीच्या लोकांसाठी यंदाचा व्हॅलेंटाईन डे खूप खास असणार आहे. या राशीच्या लोकांना या दिवशी खरे प्रेम मिळेल. या दिवसापासून तुमचे प्रेम जीवन सुरू होईल. जे विवाहित आहेत, त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल.

वृषभ – विवाह निश्चित होण्याची शक्यता

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा व्हॅलेंटाईन डे खूप छान असणार आहे. जे लोक आधीपासून प्रेमात आहेत, त्यांचे नाते या दिवशी प्रगती करू शकते. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे वैवाहिक जीवनही निश्चित होण्याची शक्यता आहे.

कर्क – तुमचा प्रस्ताव मान्य होईल

कर्क राशीच्या लोकांना व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी अनेक सरप्राईज मिळतील. या दिवशी तुम्हाला इच्छित जीवनसाथी मिळण्याची सर्व शक्यता असेल. जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या मनातील गोष्ट त्यांना नक्की सांगा. तुमचा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता आहे.

कन्या – आयुष्यात नवीन व्यक्ती येणार

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येऊ शकते. ही खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रेम आणू शकते. या राशीच्या राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे आनंदाचा असणार आहे.

तूळ – इच्छित प्रेम मिळेल

या राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे खूप रोमँटिक असणार आहे. प्रेमीयुगुलांमधील प्रेम अधिक घट्ट होईल. तुम्हा दोघांचा एकत्र वेळ खूप छान जाईल. अविवाहित लोकांना या दिवशी त्यांचे इच्छित प्रेम मिळू शकते.

धनु – नशीबवान असाल

यंदाचा व्हॅलेंटाईन डे धनु राशीच्या लोकांसाठी खूप नशीबवान असणार आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त, तुम्ही ज्याला शोधत आहात त्याला भेटू शकता. आशा आहे की या दिवशी तुम्हाला खरे प्रेम मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...