Lucky Zodiac Signs: डिसेंबरच्या सुरुवातीलाच शुक्र, चंद्र यांची युती, सिंह राशीच नाहीतर, ‘या’ 2 राशींचं फळफळणार नशीब
Lucky Zodiac Signs: काही ग्रहांची युती झाल्यानंतर त्यांचे चांगले वाईट परिणाम 12 राशींवर होताना दिसतात. आता डिसेंबरच्या सुरुवातीला शुक्र आणि चंद्र यांची युती होणार आहे... याचा फायदा फक्त सिंह राशीला नाही तर, इतर 2 राशींना देखील होणार आहे.

Lucky Zodiac Signs: ग्रहांनी त्यांची स्थिती बदलल्यानंतर त्यांचे चांगले वाईट परिणाम 12 राशींवर होताना दिसतात. ज्याचं ज्योतिषशास्त्रात फार महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी चंद्र हा मनाचा घटक मानला जातो. ग्रहांमध्ये चंद्र हा असा ग्रह आहे जो सर्वात कमी दिवसांत आपली राशी बदलतो. चंद्र एका राशीत जास्तीत जास्त अडीच दिवस राहतो. कर्क राशीचा स्वामी असलेला चंद्र, सर्वात कमी दिवसांत आपली राशी बदलतो. त्यामुळे, डिसेंबरच्या सुरुवातीला चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल. शुक्र आधीच तूळ राशीत भ्रमण करत आहे, त्यामुळे चंद्र आणि शुक्राची युती होईल.
या दोन ग्रहांची युती अत्यंत शुभ मानली जाते. ही युती डिसेंबरच्या सुरुवातीला होत असल्याने, तिचा प्रभाव सर्व राशींना कोणत्या ना कोणत्या प्रकारे जाणवेल. मात्र, काही राशींच्या जीवनात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यांना प्रचंड धन आणि यश प्राप्त होईल. तर जाणून घ्या त्या कोणत्या राशी आहेत, ज्यांना या युतीचा फायदा होणार आहे. सिंह राशीसह वृ्श्चिक आणि कर्क राशींच्या व्यक्तींचं देखील नशीब फळफळणार आहे.
सिंह : जे नोकरी करत आहेत, ते कार्यालयात यशस्वी ध्येये गाठू शकतील. या काळात त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळेल. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्यांची अध्यात्मातील रुची वाढेल. कौटुंबिक जीवनात सुधारणा होईल. तणाव कमी होईल. ज्या अविवाहित आहेत, त्यांना चांगला पती मिळेल.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या बाराव्या घरात चंद्र आणि शुक्राच्या युतीमुळे या राशींच्या भौतिक सुखसोयी आणि ऐश्वर्य वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. परदेशात काम करणाऱ्यांना चांगले फळ मिळेल. हा काळ नोकरदारांसाठी अनुकूल राहील. वरिष्ठांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. व्यावसायिकांना चांगला आर्थिक लाभ होईल. कामासाठी परदेशात जाण्याच्या संधी मिळतील. विवाहित लोकांसाठी हा काळ खूप आनंदाचा असेल.
कर्क : चंद्र आणि शुक्र कर्क राशीच्या चौथ्या घरात युतीत आहेत. यामुळे या राशींच्या आर्थिक सुविधा वाढतील. जीवनातील दीर्घकालीन समस्या संपुष्टात येतील. तुम्ही बऱ्याच काळापासून ज्या अनेक अडचणींना तोंड देत आहात, त्या संपतील. मात्र, जे काम करतात त्यांनी थोडे अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्ही अनावश्यक वाद टाळावेत. तथापि, जर तुम्ही कामावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही चांगले यश मिळवू शकता. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)