डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय घडामोडींना वेग; सचिन अहिर यांच्या विधानाने सस्पेन्स वाढला, म्हणाले, शरद पवार…
डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सचिन अहिर यांच्या विधानाने सस्पेन्स वाढला आहे. त्यांनी यावेळी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर मोठं भाष्य केलं.

डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. डिलिमिटेशन विधेयक पारित करण्यासाठी एनडीएला डीएमके आणि शरद पवारांच्या खासदारांच्या मतांची गरज आहे. हे विधेयकावरून सुप्रिया सुळे यांनी विरोध न दर्शवता बिल आल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सस्पेन्स आणखी वाढलाय. शिंदे गटाचे सचिन अहिर यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर महत्वाचं विधान केलं आहे. या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
संविधान दिनाच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर प्रदूषण विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम आणि संविधान वाचनाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र प्रदूषण विभागांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहिमेची सुरुवात आज करण्यात आली आहे. यावेळी संवाद साधताना सचिन अहिर यांनी महत्वाच्या घडामोडींवर भाष्य केलं. सुनेत्रा पवार यांच्यावर भाष्य करताना अहिर म्हणाले, ‘सुनेत्रावहिनी यांच्याबद्दल निश्चितच आदर आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, कार्यपद्धती आणि योगदान वेगळे असते. त्यामुळे दादांची तुलना त्यांच्याशी करणे योग्य ठरणार नाही’.
पुण्यातील घटनेवरून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त सचिन अहिर म्हणाले,’पुण्यात दिवसा अशी घटना घडते, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पुणे नेमके कुठे चालले आहे, असा प्रश्न निर्माण होतो. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतली आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे ही सर्वप्रथम प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाकडून योग्य आणि प्रभावी कारवाई होत नसेल, तर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. मुंबईतील माहीम परिसरात ज्वेलर्सवर गोळीबार झाला. तसेच सिने कलाकारांना धमक्या देण्याचे प्रकार घडले आहेत. मुंबई पोलिसांनी आरोपीचा काही तासांत शोध घेतला, ही पोलिसांसमोरील मोठी कसोटी आहे. मात्र या प्रकरणातील आरोपींचे सिंडिकेट किंवा इतर संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी काही संबंध आहेत का, याचाही सखोल तपास होणे गरजेचे आहे’.
शरद पवार यांच्यावर भाष्य करताना सचिन अहिर यांनी म्हटलं की, शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे जर एकत्र सत्तेत आले, तर आम्हा सर्वांनाच आनंद होईल आणि एनडीएची ताकद राज्यात आणि देशात वाढेल. त्यांना सत्तेत यायचे की बाहेर राहायचा हा निर्णय त्यांना घ्यावा लागेल. डिलिमिटेशन बिलावर राष्ट्रवादीने घेतलेली सकारात्मक भूमिका ही एका नव्या बदलाची सुरुवात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये हा चांगला संवाद आहे. शरद पवार हे राजकीय पक्षाचे प्रतिंधित्व करतात म्हणून ते त्यांच्या पक्षाची भूमिका आमदार खासदार यांना विचारून घेतील. राजकारणातून शरद पवार निवृत्त होणार, अशा बातम्या पसरविल्या जाताहेत. परंतु यात तथ्य नाही’.
